उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने
श्रावण महिन्याच्या प्रत्येक सामोवारी आणि शनिवारी उपवास केला जातो. श्रावणात उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवून खाल्ला जातो. पण रिकाम्या पोटी तेलकट पदार्थ बनवून खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे अपचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा थालीपीठ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागेल आणि पोट सुद्धा भरलेले राहील. साबुदाणा थालीपीठ आणि काकडीची कोशिंबीर हे कॉम्बिनेशन चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. साबुदाणे आणि दही एकत्र खाल्ल्यास पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. चला तर जाणून घेऊया साबुदाणा थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी