सोप्या पद्धतीमध्ये बनवा टोमॅटो सूप
थंडीमध्ये सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये सूप विकत आणले जाते. पण नेहमी नेहमी विकतचे सूप आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेले सूप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सूप बनवण्यासाठी कमी साहित्य लागते. शिवाय टोमॅटो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सूप हा पदार्थ खूप आवडतो. मंचुरियन सूप, कोरियन सूप, ब्रोकोली सूप, गाजर सूप इत्यादी अनेक वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून सूप बनवले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये सूप प्यायला एक वेगळीच मजा असते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
टोमॅटोमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्वे, खजिने आणि अँटीऑक्सीडंट्स इत्यादी घटक आढळून येतात. जे शरीरासाठी आवश्यक आहे. टोमॅटो खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. टोमॅटोचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये असलेले विटामिन्स त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहेत.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा