मेकअप हा महिलांच्या आवडीच्या विषय. आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपल्या रोजच्या आयुष्यात मेकअप करायला फार आवडते. आपले सौंदय उजळण्यास आणि अधिक सुंदर करण्यास मेकअप आपली मदत करतं असतं. प्रत्येक ऋतूत मेकअप केला जातो आणि त्यानुसार त्वचेच्या टोननुसार प्रोडक्टस आणि शेड्स निवडली जातात. सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे अनेकांना आपला मेकअप खराब होण्याची भीती असते. मात्र आता चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला अगदी सहज मेकअप खराब न होता वॉटरप्रूफ मेकअप कसा करावा याच्या काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
वाढत्या मेकअपच्या प्रभावामुळे बाजारात मेकअपचे विविध प्रकार पाहायला मिळतात. आता ट्रेंडनुसार मेकअप करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. तुम्हाला हवामानुसार तुमच्या त्वचेचा प्रकार तुम्ही ओळखला पाहिजे. बदलत्या हवामानुसार त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. सध्या वॉटरप्रूफ मेकअपला फार पसंती आहे. वॉटरप्रूफ मेकअप आपला मेकअप पाण्यापासून खराब होण्यापासून वाचवते. तुम्हीही पावसाळयात आपला मेकअप खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करू शकता.
मेकअप करताना नेहमी चांगल्या ब्रँड्सचे प्रोडक्टस वापरत जा. लो कॅलिटी प्रोडक्टसमध्ये अनेक रसायने मिसळली जातात, जी आपली त्वचा खराब करू शकतात. पावसाळ्यात तुम्ही ऑइल बेसऐवजी सिलिकॉन बेस मेकअप निवडू शकता. मेकअप सेट करण्यासाठी तुम्ही पावडरचा वापर करू शकता, यामुळे तुमचा मेकअप खराब होणार नाही. मेकअप केल्यानंतर तो सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रेने वापरायला विसरू नका.
लिक्विड किंवा क्रीम प्रोडक्टस सेट करण्यासाठी, कधीही कॉम्पॅक्ट पावडरऐवजी लूज पावडरचा वापर करत जा. कारण कॉम्पॅक्ट पावडरचा पोट फार जाड असतो, त्याच्या तुलनेत लूज पावडर हलकी असते.