गरोदरपणातील सांधेदुखी
गर्भधारणेदरम्यान ऑर्थोपेडिक समस्या दूर ठेवण्यासाठी गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात. केवळ मधुमेह, उच्चरक्तदाब, मळमळ किंवा उलट्याच नाही तर अनेक स्त्रियांना पाठदुखीचा त्रास होतो किंवा गर्भधारणेदरम्यान पायाला सूज येते.
गर्भधारणेच्या या प्रवासात सांध्याच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि स्त्रियांना भविष्यात सांधेदुखीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. डॉ. अलोक पांडे, ऑर्थोपेडिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या लेखातून सांगितल्या आहेत. त्या प्रत्येक महिलेने गरोदरपणात जाणून घेतल्या पाहिजेत. यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही स्वतःची काळजी घेणं सोपं होतं. (फोटो सौजन्य – iStock)
कंबरदुखी
बाळाच्या जन्मादरम्यान शरीर मोठ्या प्रमाणात रिलॅक्सिन हार्मोन्स तयार करते, जे प्रसुतीसाठी तुमच्या पेल्विक क्षेत्रातील अस्थिबंधन मऊ होण्यास मदत करतात. परिणामी तुमच्या नितंबाच्या भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते. या वेदना दैनंदिन कामात व्यत्यय आणतात. यासाठी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
हेदेखील वाचा – गरोदर महिलांसाठी किती फायदेशीर ठरतो योग? गायनॅकने सांगितले महत्त्व
पाठीच्या खालच्या भागातील वेदना
गरोदरपणातील कंबरदुखीचा त्रास, खालच्या भागात दुखणे
तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते जे कधीकधी खुप त्रासदायक ठरु शकते. सततच्या वेदनांमुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि तुम्हाला चिडचिडही होईल. त्यामुळे योग्य स्थितीत झोपणे अथवा हा त्रास होऊ नये म्हणून स्वतःच काळजी घ्यावी लागते.
पाय सुजणे
पायाला सूज येणे
शरीराच्या ऊतींमध्ये द्रव तयार झाल्यामुळे ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते. त्यामुळे महिलांसाठी चालतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक महिलांना अगदी 4 थ्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत पायाची सूज राहते आणि त्याचा त्रासही होतो. अशावेळी नेहमी पायाखाली उशी घेऊन झोपल्यास त्रास कमी होतो
कार्पल टनल सिंड्रोम
हे बहुतेक वेळा तिसऱ्या तिमाही दिसून येते आणि त्यामुळे बोटे आणि हातामध्ये बधीरपणा, वेदना आणि मुंग्या येणे यासारखी लक्षणे दिसतात. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तर हे गरोदरपणामध्ये अत्यंत कॉमन आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्या आणि काही अधिक त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेदेखील वाचा – गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हेपेटायटिस बी संसर्गाचा धोका अधिक
गरोदरपणात महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा
गरोदरपणात काय काळजी घ्यावी