तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. लोणचं, पापड, कुरडया, विविध प्रकारचे मसाले इत्यादी गोष्टी आवर्जून बनवल्या जातात. या पदार्थांशिवाय जेवणाला मजेदार चव येत नाही. कच्च्या कैरीचा वापर करून अनेक वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवले जातात. चटण्या, लोणचं, कैरीचे सरबत यांच्यासह कैरीचा मुरंबा सुद्धा बनवला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये कैरीचा मेथांबा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मेथी दाणे, कच्ची कैरी आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला मेथांबा चवीला अतिशय सुंदर लागतो. मेथांबा तुम्ही गरमागरम चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता. यामुळे जेवणाची रंगातदार चव वाढेल आणि चार घास जेवण जास्त जाईल, कच्च्या कैरीपासून बनवलेला मेथांबा आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. पदार्थाला पाणी किंवा घाणीचे हात न लावल्यास महिनाभरापेक्षा जास्त वेळ मेथांबा टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया मेथांबा बनवण्याची पारंपरिक रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’






