सकाळी सकस आणि पौष्टिक जेवण किंवा नाश्ता घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते. एक मसालेदार, स्वादिष्ट आणि फक्त दोन मिनिटांत बनवता येणारी रेसिपी बनवूया.
साहित्य
तेल
कांदा
हिरवी मिरची
आले आणि लसूण पेस्ट
टोमॅटो
मीठ
सांबार मसाला
हिरवे धणे
रवा आणि दही
कृती
प्रथम तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून हे सर्व एकत्र शिजवून घ्या. टोमॅटो आणि मीठ घालून मंद आचेवर शिजवा. हिरवी धणे, सांबार मसाला घालून एकत्र करा.
दरम्यान, एका भांड्यात रवा, दही, मीठ, तेल घालून जाडसर पीठ तयार करा. आवश्यक असल्यास पाणी घाला. पिठात मीठ घाला.
आता टोमॅटो-कांदा मिश्रणाचे चार भाग करा. या चार मिश्रणात पीठ टाका आणि एक मिनिट शिजवा. बाजू पलटी करून थोडा वेळ शिजवून गरमागरम सर्व्ह करा. तयार आहे तुमची गरमा गरम स्पॉट इडली.
तुम्ही सुधा नक्की बनवा आणि स्पॉट इडली खाण्याचा आनंद लुटा.
Web Title: Instantly make spoft idlis only in 2 markets nrrd