AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर
AI Impact Expo 2026: AI होणार अधिक शक्तिशाली? मानव मागे पडणार? Dario Amodei यांचा धक्कादायक दावा
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये अमेरिकन टेक कंपनी Adobe ने भारतीय विद्यार्थ्यांना सरप्राईज देत घोषणा केली आहे की, कंपनी त्यांच्या एआय पावर्ड प्रोडक्टिविटी आणि क्रिएटिविटी अॅप्स, फोटोशॉप, अॅक्रोबॅट आणि फायरफ्लायचे मोफत सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. ही ऑफर भारतातील मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे. ही ऑफर म्हणजेच स्ट्रेटेजिक इन्वेस्टमेंट असल्याचे एडोबीचे म्हणणे आहे. कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील एआय आधारित क्रिएटिविटी आणि प्रोडक्टिविटीला अतिरिक्त शक्ती मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)
AI प्रोडक्टिविटी आणि क्रिएटिविटी अॅप्सच्या मोफत सब्सक्रिप्शनसोबतच विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर एक करिकुलम देखील दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी या टूल्सचा योग्य वापर करू शकणार आहेत. एडोबीचं असं म्हणणं आहे की, AI-फर्स्ट ऑफर, करिकुलमसह, 15,000 शाळा आणि 500 कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे. यामध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्सचा देखील समावेश असणार आहे. यापूर्वी सरकारने बजेटमध्ये देखील याबाबत घोषणा केली होती.
अमेरिकन टेक कंपनी Adobe ने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सांगितलं आहे की, विद्यार्थ्यांना एआय लर्निंग कोर्स आणि सर्टिफिकेशन देण्यासाठी नॅसकॉम फ्युचरस्किल्स प्राइम सोबत भागीदारी देखील करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजेच अॅडोब डिजिटल अकादमीचा एक विस्तार आहे.
Adobe च्या सब्सक्रिप्शन पॅकेजबद्दल बोलायचं झालं तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या महिन्यासाठी 400 रुपये खर्च येतो. त्यानंतर, तुम्हाला दरमहा 2714 रुपये द्यावे लागतील. या स्टूडेंट पॅकेजमध्ये फोटोशॉप, इलस्ट्रेटर, प्रीमियर, अॅक्रोबॅट प्रो, अॅडोब एक्सप्रेस, अॅडोब फायरफ्लाय, आफ्टर इफेक्ट्स, इनडिझाइन, लाईटरूम, अॅडोब एक्सडी, ऑडिशन, अॅनिमेट, ड्रीमवीव्हर, इनकॉपी, लाईटरूम क्लासिक, कॅरेक्टर अॅनिमेटर, कॅप्चर, अॅडोब फ्रेस्को, ब्रिज, फोटोशॉप एक्सप्रेस, मीडिया एन्कोडर, लाईटरूम वेब, अॅक्रोबॅट रीडर, अॅडोब स्कॅन आणि फिल अँड साइन सारखे प्रीमियम टूल्स मिळणार आहेत.






