ईशा अंबानीचा ममेरू सोहळ्यासाठी लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू होताच अँटिलिया बिल्डिंगला नववधूप्रमाणे सजवण्यात आले होते. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये गुजराती विधी मामेरूसाठी 3 जुलै रोजी संपूर्ण अंबानी कुटुंबीय दिसून आले. यावेळी अंबानी कुटुंबातील जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि बॉलिवूड स्टार्सही जमले होते.
पण अंबानी कुटुंबाची सून श्लोका मेहता, राधिका मर्चंट यांच्यावर मुलगी ईशा अंबानीचा लुक भारी ठरल्याचे दिसून आले. राधिका आणि श्लोकाच्या लुकचे तर कौतुक झालेच. पण या नणंद-वहिनीच्या सौंदर्याने सर्वच खिळले. ईशाचा लुक पाहून हिला २ मुलं आहेत असं कोणालाच वाटणार नाही. पाहा ईशाचा क्लासी लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
ईशाची किल्लर स्टाईल
ईशा अंबनाीचा साडी लेहंगा लुक
अंबानी कुटुंबाची एकुलती एक मुलगी ईशा अंबानीची ही किलर स्टाईल सर्वांनाच भारी वाटतेय. ईशाने तिचा भाऊ अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी केशरी रंगाची लेहेंगा साडी निवडली आहे. बांधणीचा लुक देणारी ही लेहंगा साडी खूपच क्लासी आणि एलिगंट दिसून येत असून अनायता श्रॉफ अडजानियाने ईशाची स्टाईल केली आहे.
गोल्डन ब्लाऊज
ईशाच्या ब्लाऊजची स्टाईल
साडीचा लुक आणखी आकर्षक करण्यासाठी ईशाने साडीसोबत गोल्डन आणि ऑरेंज कलर कॉम्बिनेशन ब्लाउज घातला होता. या ब्लाउजवर बरेच काम करण्यात आले आहे. हा स्लीव्हलेस ब्लाऊज डीप असून ईशाने परफेक्ट कॅरी केला आहे. तर यासह गोल्डन बेल्टदेखील तिने कंबरेला लावला आहे.
कुंदनचे दागिने
कुंदनचे स्टायलिश दागिने
ही लेहेंगा साडी ईशाच्या सौंदर्यात भर घालताना दिसून येत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पांढऱ्या आणि हिरव्या स्टोन्सने जडवलेला कुंदनचा जड नेकलेस, कुंदनचे जड झुमके आणि मोठा मांगटिका केसांमध्ये लावलाय. या दागिन्यांनी ईशाच्या चेहऱ्यावरील सौंदर्य अधिक सुंदर आणि आकर्षक केले आहे.
वेव्ही हेअरस्टाईल
मोकळ्या केसांची स्टाईल
ईशाने या लेहंगा साडी लुकवर केस मोकळे ठेवले असून त्यांना वेव्ही लुक दिलाय. ईशाचा हा लुक कोणत्याही फंक्शनसाठी परफेक्ट ठरू शकतो. तर तिने स्वतःला मेंटेन ठेवत हा लुक अत्यंत क्लासी आणि एलिगंट पद्धतीने कॅरी केलाय.
सटल मेकअप
ईशाचा क्लासी लुक
कपाळावर लहानशी टिकली आणि अत्यंत सटल मेकअप तिने केला आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने ईशाचा मेकअप केला असून डार्क आयब्रो, स्मोकी आईज लुक, आयलॅश, आयलायनर, काजळ आणि ग्लॉसी ब्राऊन लिपस्टिक लावत तिने तिचा लुक पूर्ण केलाय.