Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaggery: एकेकाळी गरीबांचा गूळ, आज आरोग्याचा ‘सुपरफूड’; बाजारात साखर पडली फिकी

Jaggery In Demand over Sugar For Health: आजकाल फिटनेसच्या दृष्टीकोनाने अनेकजण साखरऐवजी गुळाचा वापर करतात. यामुळे बाजारात गुळाच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 28, 2026 | 08:34 PM
Jaggery: एकेकाळी गरीबांचा गूळ, आज आरोग्याचा ‘सुपरफूड’; बाजारात साखर पडली फिकी
Follow Us
Follow Us:

सुरेश चव्हाण

  • गूळ आरोग्याचा सुपरफूड
  • साखरऐवजी गुळाला पसंती
  • बाजारात साखर पडली फिकी
काही वर्षापूर्वी घरात गुळाचाच वापर होत होता. त्यामुळे चहापासून ते घरातील गोडधोड पदार्थात गुळाचा वापर होत होता. घरी पाहुणे आले तरच साखरेचा चहा व्हायचा. साखरेचा चहा म्हटले की प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे. काळानुरूप बदल झाला आणि गुळाची जागा साखरेने घेतली. मात्र आता पुन्हा साखरेला असलेली प्रतिष्ठा आता गुळाला मिळू लागली आहे. गुळाचा वापर अनेक जण आवर्जून करू लागले आहेत. गूळ हा आयुर्वेदीक असून त्याचा चहा पिल्याने आरोग्य चांगले राहत आहे. सध्या साखर ४४ रुपये तर गुळ ७० ते ८० रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारात विकला जात आहे. त्यामुळे सध्या तरी ‘गूळ हसला, साखर रूसली, असे चित्र बाजारात दिसत आहे. वासडी आणि पिशोर परिसरातील गावे पूर्वीपासून ऊस आणि गुळासाठी प्रख्यात आहेत. या दोन्ही गावांच्या परिसरात १९९५ च्या आसपास सुमारे शंभर गुऱ्हाळे सिझनभर चालत असत.

Thyroid: थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी

साखरऐवजी गुळाला पसंती

अनेकांना यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होत असे. आता फक्त ही संख्या पाच ते सहा इतकी मर्यादीत झाली आहे. कारण गुळ निर्मिती व्यवसायात खर्च खूप वाढला आहे. ऊस तोडणी, वाहतूक खर्च, प्रत्यक्ष गुळ निर्मिती, मजुरी वाढली. त्यामूळे गुऱ्हाळे एक एक करीत बंद पड़त गेली. परिसरातील गुळ बनविण्याची प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असल्याने सहाजिकच या गुळाला वेगळी चव असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना या तीन जिल्हयात पिशोर आणि परिसरातील गूळ प्रसिद्ध आहे. येथील गुळाला वर्षभर मागणी असते. शेतात लागवडी नंतर एका वर्षात ऊस काढणीला येतो, आता गुळाला ज्यादा भाव असल्याने अनेक जण उसापासून गुळ बनवून विकणे फायदेशीर समजतात. पण त्यातही आता गुऱ्हाळासाठी मजुरांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच वाढता खर्च यामुळे गूळ निर्मिती खर्चिक झाली आहे. गूळ तयार करतांना भेंडी अथवा शेवरी वृक्षाचा वापर केला जातो. या दोन्ही वृक्ष आयुर्वेदीक आहेत.

८६०३२ प्रजातीच्या गुळाला मागणी

आयुर्वेदाकडे लोकांचा कल वाढल्याने प्रत्येकजण आता साखरेऐवजी गुळाचा वापर वाढवित आहेत. याचाच परिणाम म्हणून साखरेऐवजी गुळाच्या चहाला पसंती वाढू लागली आहे. ग्राहकांची ही पसंती पाहुन ठिकठिकाणी’ गुळाचा चहा असलेल्या हॉटेल दिसू लागल्या आहेत. पूर्वी ४१९ प्रजातीचा ऊस गुळ करण्यासाठी वापरला जात होता. ऊसाची ही प्रजात नष्ट होत चालल्याने ८६०३२ या प्रजातीच्या गुळाला बाजारात मागणी आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

Web Title: Jaggery demand increase health benefits vs sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • lifestyle news in marathi
  • sugar cane
  • Sugar Price
  • Sugarcane Farmers

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.