जे.जे. समूह रुग्णालयात नाकाच्या सर्जरीसाठी राइनाेप्लास्टी शस्त्रक्रिया
मुंबई: चेहरा अधिकाधिक खुलून दिसण्यासाठी नाक चाफेकळी, रेखीव असणं याकडे स्त्री असाे की पुरुष विशेष लक्ष देतात. बहुतांशीवेळा, चेहरा आकर्षक, सुंदर असला तरी नाक चपट असतं, काहीस जाड असतं, थाेडं नकटं असतं अशावेळी नाकामुळे अडचणींचा सामनाही करावा लागताे. अशास्थितीत बहुतांशी जण नाक चाफेकळी सारखं दिसण्यासाठी नाकाची शस्त्रक्रिया करतात. बऱ्याचवेळा, खासगी रुग्णालयातील महागड्या शस्त्रक्रिया सर्वसामान्यांच्याखिशाला परवडत नाही. पण मागील काही वर्षांपासून राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या जे.जे. समूह रुग्णालयात प्लॅिस्टक सर्जरी विभागातील तज्ज्ञ नाकावर यशस्वी शस्त्रक्रिया करत आहेत. या सर्जरी अल्पदरात हाेत असून वर्षाकाठी रुग्णालयात साधारण 40 ते 45 जण नाकाची शस्त्रक्रिया करत आहेत. तर महिन्याला 5 ते 6 जण नाकाची शस्त्रक्रिया करण्यास रुग्णालयात दाखल हाेतात तर तरुणाईचा या शस्त्रक्रियेकरीता अधिक कल असल्याचे दिसून येत आहे .
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
24 व 25 जानेवारी या दाेन दिवशीय सेंट जाॅर्ज रुग्णालयात ऑपरेटिव्ह राइनाेप्लास्टी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आहे हाेते. या कार्यक्रमाचे यंदाचे हे 6 वे वर्ष आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून आलेल्या रुग्णांच्या नाकाच्या विकृतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सर जे.जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे,उपअधिष्ठाता डाॅ. गजानन चव्हाण, डाॅ. नितीन माेकल ( प्राध्यापक, प्लािस्टक सर्जरी विभाग, सर जे.जे. समूह रुग्णालय), डाॅ. चंद्रकांत घरवाडे (विभाग प्रमुख प्लास्टीक सर्जरी, जे.जे. रुग्णालय),डाॅ. उदय भट (प्राध्यापक, प्लािस्टक सर्जरी विभाग, नायर हॉस्पिटल), डाॅ कपिल अग्रवाल (प्राध्यापक प्लािस्टक सर्जरी विभाग केईएम हाॅिस्पटल), डाॅ. राहुल आमाले आणि डाॅ. वेंकट रममण(हैदराबाद) यांच्यासह अन्य तज्ज्ञ डाॅक्टरांच्या टीमने रुग्णांच्या नाकाच्या रचनेला सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. या दाेन दिवशीय कार्यशाळेत 7 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
राइनाेप्लास्टी ही एक अत्यंत सामान्यपणाने केली जाणारी प्लािस्टक शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. त्यात नाकाची विकृती सुधारण्यासाठी 9 क्लीष्ट शस्त्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेत अपघात, जन्मदाेष किंवा राेगांमुळे नाकाच्या विकृतीवर उपचार कसा केला जाताे यावर कार्यशाळेत माहिती देण्यात आली. राइनाेप्लास्टी ही कला व शस्त्रक्रिया यांचे एक अदि्वतीय संयाेजन आहे. हल्ली चेहरा आकर्षित करण्याकडे अधिक कल असल्याने नाकाही चाफेकळी दिसण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढताे, अशास्थितीत प्लास्टिक सर्जन्स नाकाच्या शारीिरक रचनांचा, कारणांचा व याेग्य उपचार पध्दतीचा अभ्यास करुन साैदर्य खुलुन दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केली जातेे.
सर जे.जे. समूहाने 180 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण व नवकल्पनांमध्ये नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे . ही थेट ऑपरेटिव्ह कार्यशाळा आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या व सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक शस्त्रक्रिया प्रदान करण्याचा आमचा सातत्याने कल असताे. त्यादृष्टिने जे.जे. समूह नेहमी कार्यरत राहणार आहे. डाॅ. पल्लवी सापळे ( अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
राइनाेप्लास्टी ही शस्त्रक्रिया शास्त्र व कलेचे संयाेजन आहे. हे ज्ञान आगामी पिढीपर्यंत पाेहाेचवणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा कार्यशाळांद्वारे आम्ही फक्त शस्त्रक्रिया तंत्रच शिकवत नाही तर रुग्णांमध्ये आत्मविश्स्वास देखील निर्माण करत असताे. डाॅ. चंद्रकांत घरवाडे (विभाग प्रमुख प्लास्टिक सर्जरी, जे.जे. रुग्णालय)