Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ४० व्या वर्षी चेहरा राहील तरुण आणि देखणा! जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे सौंदर्यात होईल वाढ, राहाल कायमच फिट

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी नियमित पालेभाज्या आणि फळांचे आहारात सेवन करावे. यामुळे केवळ शरीराचं नाहीतर त्वचा आणि केसानसुद्धा भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2026 | 05:30 AM
वयाच्या ४० व्या वर्षी चेहरा राहील तरुण आणि देखणा! जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे सौंदर्यात होईल वाढ, राहाल कायमच फिट

वयाच्या ४० व्या वर्षी चेहरा राहील तरुण आणि देखणा! जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे सौंदर्यात होईल वाढ, राहाल कायमच फिट

Follow Us
Follow Us:

वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांच्या शरीरात असंख्य बदल होतात. मात्र हे बदल महिलांच्या शरीरात खूप जास्त दिसून येतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, अचानक मासिक पाळी बंद होणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना तर काहीवेळा शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढी लागतो. याशिवाय चेहऱ्यावर येणारे अनावश्यक केस, त्वचा रखरखीत, कोलोजनची पातळी कमी होणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होतो. वय वाढल्यानंतर महिलांनी स्वतःची आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मुलांमधून स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करायला जास्त वेळ मिळत नाही? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा मसूर डाळ, चेहऱ्यावर येईल ग्लो

४० व्या वर्षानंतर शरीरातील कोलोजनची पातळी कमी कमी होत जाते. कोलेजन कमी झाल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या, ऍक्ने, बारीक रेषा येऊन त्वचा सैल होण्यास सुरुवात होते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतात. महागड्या स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे काही काळापुरतीच त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी दिसते. पण कालांतराने त्वचेच्या समस्या आणखीनच वाढू लागतात. केमिकल युक्त स्किन ट्रीटमेंट सूट न झाल्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षी त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

चेहऱ्यावरील ग्लो टिकवून ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल:

वाढत्या वयात कायमच फिट आणि हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे फार आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे केवळ शरीराचं नाहीतर त्वचा आणि केसांच्या आरोग्याला सुद्धा खूप जास्त फायदे होतात. शारीरिक हालचाल केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. व्यायाम केल्यामुळे शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यासोबतच वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारते.

वय वाढल्यानंतर त्वचेची खूप जास्त काळजी घेणे फार आवश्यक आहे. आहारात विटामिन सी असलेल्या फळे, भाज्यांचे सेवन करावे. याशिवाय लिची, संत्री बेरीज, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. तर सोयाबीन, डाळी, बीन्स, नट्स, शतावरी, मशरूम, पालक इत्यादी पदार्थ रोजच्या जेवणात खावे. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या बियांचे आणि सुका मेव्याचे सेवन करावे.

शरीर हायड्रेट राहिल्यास त्वचा खूप जास्त फ्रेश आणि चमकदार दिसते. त्यामुळे नियमित ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच त्वचेवर आलेले पिंपल्स आणि मुरूम कमी होण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेली घाण आणि रक्त शुद्ध करण्यासाठी पाण्यासोबतच डिटॉक्स पेयांचे सुद्धा सेवन करावे. डिटॉक्स पेय शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत करतात.

मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर

डेली रूटीनमध्ये स्किन केअर फॉलो करायला अजिबात विसरू नका. स्किन केअर रुटीनमध्ये क्लिंजिनंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजिंग करणे फार आवश्यक आहे. यामुळे त्वचा खूप फ्रेश आणि चमकदार दिसते. स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही १० टक्के विटामिन सी सीरमचा वापर करू शकता. पण त्वचा कायमच चमकदार आणि हेल्दी हवी असेल तर शुगर असलेल्या पेयांचे अजिबात सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Keep your face looking young and handsome even at 40 these lifestyle changes will enhance your beauty and keep you fit forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.