पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करायला जास्त वेळ मिळत नाही? मग 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा मसूर डाळ, चेहऱ्यावर येईल ग्लो
घरात कोणताही कार्यक्रम असल्यास किंवा लग्नाच्या काही दिवस आधी सर्वच महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. फ्रुट फेशिअल तर कधी हायड्रा फेशिअल करून त्वचेवर जमा झालेली डेड स्किन, धूळ, माती, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढले जातात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे वेळ लगेच निघून जातो. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स तर काहीवेळा तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची जास्त शक्यता असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर पार्लरमध्ये जाऊन फेशिअल, वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट तर काहीवेळा आयव्ही सुद्धा घेतल्या जातात. यामुळे काही काळापुरता चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन चेहऱ्यावरील चमक नाहीशी होऊन जाते आणि चेहरा अतिशय डल दिसतो. फेशियल, क्लिनअप केल्यानंतर काही दिवसांपुरता ग्लो चेहऱ्यावर टिकून राहतो, मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी फेशिअल न करता मसूर डाळीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मसूर डाळ चेहऱ्यावर लावल्यामुळे कमी वेळात चेहरा तुमचा चमकदार दिसेल. यामुळे तुम्हाला फेशिअल किंवा क्लीनअप करण्याची कोणतीही आवश्यकता भासणार नाही.
कडाक्याच्या उन्हात काहीवेळ बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर मोठे मोठे फोड आणि मुरूम सुद्धा येतात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन चमचे मसूर डाळ घेऊन त्यांची बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. वाटीमध्ये तयार केलेली मसूर डाळ पावडर, मुलतानी माती आणि तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात जेष्ठमध पावडर घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात हळद, मध आणि खोबरेल तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या.
Skin Care Tips: ग्लोइंग स्किनचे रहस्य तुमच्या किचनमध्ये; आहारात करा ‘या’ सुपरहेल्दी सीड्सचा समावेश
मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यासोबतच त्वचा उजळदार होण्यास मदत होईल. आठवडाभर नियमित मसूर डाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी होण्यास मदत होईल. मसूर डाळीमध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. याशिवाय टॅन कमी करून त्वचा चमकदार आणि सुंदर करते. त्वचेवर आलेले काळे डाग कमी करण्यासाठी जेष्ठमध पावडर खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा नियमित मसूर डाळ चेहऱ्यावर लावावी.






