आज काल भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो, त्यात किडनी स्टोन चा त्रास असणाऱ्या लोकांचा तर जास्त पाणी पिण्यावर आणखीनच जोर असतो, परंतु जास्त पाणी पीणे देखील आरोग्यास हानिकारक आहे, आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. त्यामुळे दिवसभरात योग्यप्रमाणात पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
हृदय :
जास्त पाणी प्यायल्याने हार्ट फेलियर होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते ज्याचा दबाव हृदयांच्या नसांवर निर्माण होतो. जास्त दबावाने हार्ट फेलियर होऊ शकते. त्यामुले योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
किडनीचा त्रास:
जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा आर्जिनिन वॅसोप्रेसिनचा प्लाज्मा स्तर कमी होतो. याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात प्यावे. शरीर ओवरहाइड्रेशन झाले तर सोडियमचे प्रमाण देखील कमी होते. त्यामुळे मेंदूला सूज येऊ शकते. मेंदूला परिणाम झाल्याने विचार करण्याची क्षमता देखील कमी होते.
यकृत:
iron (लोह) चे प्रमाण जास्त असलेले पाणी प्यायल्याने देखील ओवरहाइड्रेशन होते. iron (लोह) चे प्रमाण जास्त असलेले पाणी प्यायल्याने यकृतासंबंधित आजार होऊ शकतात.
जास्त सोडीयम आणि कमी पोटॅशियम:
जास्तीचे सोडीयम आणि कमी प्रमाणात पोटॅशियमच्या सेवनामुळे जास्त तहान लागते. जास्त प्रमाणात मिठ खात असल्यास शरीर जास्तीच्या पाण्याची मागणी करते. जास्त मिठ खाल्याने शरिरातील सेल्समधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असते. जास्त पाणी पिल्याने ओवर-हायड्रेशन होते. यामुळे उलटी होणे, डोकेदुखी, मानसिक स्थिती बिघडणे.
उदा. भ्रम किंवा विचलन अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आदर्श मानलं जातं. व्यक्तीची उंची, वजन किंवा व्यायामाची पद्धत यावरुन पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
Web Title: Know the dangers of drinking too much water