(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉसच्या मराठीच्या सहाव्या पर्वात देखील सतत काही ना काही घडताना दिसते आहे. घरात भांडण, राडा, गटबाजी, आरोप – प्रत्यारोप यांमुळे घरात सतत ट्विस्ट येताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एका टास्कदरम्यान राकेश आणि तन्वीच्या डान्सने राखी दुखावली होती. या डान्सदरम्यान राकेशने तन्वीच्या गालावर किस केली होती. राकेशच्या अशा वागण्यामुळे राखीने तिचे केस कापले होते. राखीच्या या अशा वागण्याचा राकेशसह सर्वांना धक्का बसला होता. आता यानंतर भाऊच्या धक्क्यावर राखीचे स्वयंवर पार पडणार आहे.
Jab We Met चा सीक्वल येणार? ‘गीत’-‘आदित्य’साठी नव्या स्टारकास्टची चर्चा, दिग्दर्शक Imtiaz Ali यांनी दिले संकेत
नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. यात भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार याची झलक पाहायला मिळत आहे. शेअर केलेला प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की राखीच्या हातात दोन फुलांचे हार आहेत. रितेश राखीला विचारतो, राखी हा हार तुम्ही कोणाच्या गळ्यात घालणार? त्यानंतर राखी राकेशचे नाव घेते. त्यावर रितेश म्हणतो की जीत जरी तुमची असली तरी हार त्यांचीच आहे. त्यावर सगळे घरातील सदस्य हसताना दिसतात.
प्रोमोमध्ये पुढे राकेश डान्स करत स्टेजकडे जाताना दिसतो. त्यानंतर राखी त्याच्या गळ्यात हार घालते आणि राकेशही राखीच्या गळ्यात हार घालतो.रितेश हसत राखीला विचारतो, “तुमची कपटी नणंद कोण आहे?” त्यावर राखी तन्वीचे नाव घेते. हे ऐकून सगळेच हसू लागतात. शेवटी सगळे स्पर्धक एकत्र नाचताना दिसतात.रितेश पुढे म्हणतो की आता लग्नातील फॅमिली फोटो घेऊयात. त्यानंतर सगळे एकत्र येऊन फोटोसाठी पोज देतात. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं, ”राखी आल्यापासून गालावर हसू आलं”, तर दुसऱ्याने, ”एकदम कडक”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.






