फळांचा राजा अशी ओळख असलेला कोकणचा हापूस आंबा याला जगभरातून प्रचंड मागणी आहे आणि आता तर आंब्याचा हंगामदेखील सुरू झाला आहे. कैरीपासून लोणचे, छुंदा, पन्हे, आमटी केली जाते. तर आंब्याचे रायते, सरबत, आमरस, साठे, आंबावडी असे अनेक पदार्थ बनवले जातात. आंबाव्यक्तिरिक्त अशी कितीतरी फळे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. हा कोकणी मेवा प्रत्येकाने चाखायलाच हवा(konkani meva health benefit ).
आंबा खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचा पोत सुधारतो. अशक्तपणा कमी होतो. आंबा उष्ण असल्यामुळे तो उपाशीपोटी खाऊ नये. पित्त होण्याचा धोका असतो. शरीरातील उष्णता आंब्याच्या अतिसेवनामुळे वाढते. आमरस जेवणानंतर खाल्ल्याने सुस्ती येते. आंब्यात शुगरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ऊर्जा मिळते मात्र मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खाऊ नये.
क जीवनसत्त्व करवंदामध्ये असते. करवंद त्वचाविकारासाठी फायदेशीर आहे. करवंदात सायट्रिक अॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. करवंदाचा गुणधर्म थंड असतो. करवंदाचा वापर लोणचे, सरबत तयार करणे आणि सुकवून खाण्यासाठी केला जातो. अतिप्रमाणात करवंदाचे सेवन केल्यास सर्दी-खोकला होण्याचा धोका असतो. करवंदाचा चीक घशाला लागल्याने घशात खवखव होण्याची शक्यता असते.
फणसामध्ये थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम लोहाचा समावेश असतो. फणसाच्या गऱ्यांपासून व्हिटॅमिन ए आणि सी जीवनसत्त्व मिळतात. फणसापासून पापड, कच्च्या फणसाची भाजी, कच्च्या फणसाचे तळलेले गरे, बरक्या फणसापासून इडली(सांजण), फणसपोळी केली जाते. हाडांसाठी फणस गुणकारी असल्याने त्याचे सेवन करावे. फणसाच्या गऱ्यांवर पाणी प्यायल्याने पोटात दुखण्याचा, उलटी किंवा मळमळ सुरू होऊ शकते. फणसाची ज्यांना अॅलर्जी आहे किंवा पचनशक्ती कमजोर आहे अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने फणस खावा.
कोकणातील सर्वांत आरोग्यदायी फळ कोकम हे आहे. आगळ, सरबत, आमसूल कोकमापासून तयार केले जाते. कोकम हे पित्तशामक आहे. पित्ताचा ज्यांना त्रास होतो त्यांनी रोज एक आमसूल खावे. कोकम आपण आंबटपणा येण्यासाठी जेवणातही चवीनुसार वापरतो.
काजू हे कोकणातील अजून एक प्रसिद्ध फळ असून हिरव्या काजूची भाजी, काजूला येणारे फळ म्हणजे बोंडूपासून कोशिंबीर, लोणचे, नुसता बोंडूही बऱ्याचदा खाल्ला जातो. काजूचे शरीरातील ताकद वाढवण्यासाठी सेवन करावे. काजूचा गुणधर्म उष्ण असल्यामुळे अतिप्रमाणात काजूचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. काजूचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. बरेच वेळा तोंडात ज्वर येतात, अंगावर फोडही उठतात. त्यामुळे काजूचे सेवन हे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हवे.
ताडगोळा हे फळ किनारपट्टीच्या ठिकाणी आढळते. ताडगोळा शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी थंडावा निर्माण करण्यास मदत करते. ताडगोळा खाल्ल्याने अशक्तपणाच्या त्रासापासून सुटका मिळते.
या फळामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. जांब या फळाचा गुणधर्म थंड असतो. याला जाम असेही म्हणतात. शरीरात ऊर्जा आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. नीरा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. डियाड्रेशनचा त्रास होत नाही. वजन कमी करणाऱ्यांनी मात्र नीराचे सेवन करणे टाळावे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]






