(फोटो सौजन्य – Pinterest)
Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त
सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान मोबाईल
सोशल मीडियामुळे मित्र-मैत्रिणीसोबत सतत संपकांत राहणे सोपे झाले आहे, ज्यामुळे ते डेटिंगच्या निर्णयात थेट हस्तक्षेप करतात. मित्र-मैत्रिणींच्या मतांचा आणि मान्यतेचा तरुणांवर खूप प्रभाव असतो; ते जोडीदाराला ‘ओके’ म्हणत नाहीत तोपर्यंत अनेकदा नवीन नात्यात पुढे जात नाहीत.
सुरक्षितता आणि पडताळणी
मित्र-मैत्रिणींच्या मदतीने जोडीदाराची पार्श्वभूमी तपासणे किंवा तो खरोखरच योग्य आहे का, हे पडताळणे सोपे होते, असे या पिढीला वाटते. आजच्या डेटिंगमध्ये अनेक बारकावे असतात, त्यामुळे मित्र-मैत्रिणीच्या अनुभवावरून आणि सल्ल्यावरून अनेकदा निर्णय घेतले जातात. थोडक्यात, जेन झी साठी प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधील गोष्ट राहिली नसून, त्यात मित्रांचा सहभाग आणि त्यांची ‘परवानगी’ महत्त्वाची ठरते, असे आजच्या ट्रेंडवरून दिसते.
मित्रमंडळी करतात सावध डेटिंग इतके
गोंधळात टाकणारं झालंय की लोक स्वतःच्या भावनांपेक्षा मित्रांच्या अनुभवांवर जास्त विश्वास ठेवू लागले आहेत. चुकीच्या नात्यांमुळे झालेली वेदना, फसवणूक किंवा गैरसमज मित्रांनी जवळून पाहिलेले असतात. त्यामुळे “सावध रहा” हा सल्ला आपोआपच महत्त्वाचा ठरतो. अनेकदा मित्र एखादी छोटी गोष्टही मोठा इशारा म्हणून दाखवतात आणि त्यामुळे नात्याबद्दल शंका निर्माण होते. आजच्या काळात खरं डेटिंग ॲप म्हणजे मित्रांचा व्हॉट्सॲप ग्रुप झाला आहे. डेटपूर्वी कपड्यांवर चर्चा, डेटनंतर सविस्तर अपडेट्स, स्क्रीनशॉट्स शेअर करणं हे सर्वसाधारण झालं आहे. विशेषतः महिलांसाठी मित्र हे भावनिकच नव्हे तर सुरक्षिततेचं कवचही ठरतात. लाईव्ह लोकेशन शेअर करणं, कोड वर्ड ठरवणं, वेळेवर कॉल करणं या सगळ्यातून ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’चा सकारात्मक पैलू दिसतो.
फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?
मानसिक सुरक्षितता, भावनिक आधार अधिक महत्वाचा
मात्र याची दुसरी बाजूही आहे. खूप जास्त मतं घेतली गेली तर आकर्षण कमी होऊ शकतं, कधी कधी मित्र स्वतःच्या भूतकाळातील अनुभवांची छाया तुमच्या नात्यावर टाकतात. एखादी साधी सवयही ‘रेड फ्लॅग’ वाटू लागते. मित्रांना एखादी व्यक्ती खूप आवडली, तर नाते तोडणंही कठीण होते, जरी स्वत: ला ते नातं योग्य वाटत नसलं तरी, जेन झी आणि तरुण मिलेनियल्समध्ये हा ट्रेंड अधिक दिसतो, त्यांच्यासाठी मानसिक सुरक्षितता, भावनिक आधार आणि कम्युनिटी महत्त्वाची आहे. प्रेम है एकट्याचं न राहता मित्रपरिवारात मिसळलेलं असतं.त्यामुळे मित्रांचा सहभाग त्यांना नैसर्गिक वाटतो. ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’ पूर्णपणे वाईट नाही, पण समतोल गरजेचा आहे. मित्र मार्गदर्शन करू शकतात, इशारे देऊ शकतात, पण शेवटी भावना तुमच्याच असतात, प्रेम वैयक्तिक असतं, जरी ते एकट्यानं जगलं जात नसलं तरी.






