Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढगांशी संवाद साधतो पुण्यातील हा प्राचीन किल्ला, 3389 फूट उंच आणि अनेक राजवंशांच्या राजवटीचा साक्षीदार

Lohgarh Fort : केतन अग्रवाल हत्याकांडानंतर लोहगढ देशभर फार चर्चेत आहे. 10 व्या शतकात या किल्ल्याची बांधणी करण्यात आली असून भारताच्या ऐतिहासिक वैभवाचा हा किल्ला जिवंत साक्षीदार आहे. किल्ल्याची खासियत, इतिहास आणि इथे कसे जायचे ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 08:18 AM
ढगांशी संवाद साधतो पुण्यातील हा प्राचीन किल्ला, 3389 फूट उंच आणि अनेक राजवंशांच्या राजवटीचा साक्षीदार

ढगांशी संवाद साधतो पुण्यातील हा प्राचीन किल्ला, 3389 फूट उंच आणि अनेक राजवंशांच्या राजवटीचा साक्षीदार

Follow Us
Follow Us:
  • एका ऐतिहासिक किल्ल्याशी संबंधित रंजक माहिती सध्या चर्चेत आली आहे.
  • या ठिकाणाचा इतिहास आणि निसर्गरम्य वैशिष्ट्ये पर्यटकांना आकर्षित करतात.
  • ट्रेकिंगप्रेमींसाठी हे ठिकाण का खास मानले जाते, जाणून घ्या.
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीने त्याला ढकलून दिल्याने किल्ल्यावरुन कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सध्या देशभर चर्चेत असून यामुळे लोहगडदेखील लोकांच्या नजरेत आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा साधासुधा किल्ला नसून देशातील सर्वात प्रचीन आणि उंच किल्ला आहे. किल्ल्याचा इतिहास फारच रंजक असून अनेक राजवंशांच्या राजवटीचा हा किल्ला साक्षीदार आहे. तुम्हालाही ट्रेकिंगची आवड असल्यास तुम्ही पुण्यातील लोहगडाला नक्कीच भेट देऊ शकता.

Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका

ढगांशी संवाद साधतो हा किल्ला

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला हा किल्ला भारताच्या ऐतिहासिक वैभवाचा एक जिवंत पुरावा आहे. समुद्रतळापासून 3,389 फूट उंच या किल्ल्याला Iron Fort या नावानेही ओळखले जाते. प्राचीन इतिहास आणि अद्भूत वास्तुकला यामुळे पर्यटकांमध्ये हा किल्ला नेहमीच लोकप्रिय असतो.

अनेक राजवटींचा साक्षीदार राहिलाय

लोहगड किल्ल्याचा इतिहास फार जुना आणि अनेक राजवटींशी जोडलेला आहे. सर्वात आधी 10 व्या शतकात लोहतमिया राजवंशाने या किल्ल्याची बांधणी केली. यानंतर काळासोबतच या किल्ल्यावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजाम, मुघल आणि मराठा साम्राज्यांनी राज्य केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ – 1648 मध्ये, छत्रपति शिवाजी महाराज यांनी किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपल्या बुद्धीच्या जोरावर किल्ल्याला काबीज केले. तथापि 1665 च्या पुरंदरच्या तहानुसार त्यांना हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. परंतु 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा मुघलांकडून हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला. सुरत मोहिमेतून आणलेला खजिना साठवण्यासाठी या किल्ल्याचा तेव्हा वापर केला जात होता.

पेशवांचा काळ – नंतर पेशवा काळात लोकप्रिय नेता नाना फडणवीस यांनी येथे आश्रय घेतला. त्यांनी त्याकाळात किल्ल्यावर एक मोठी पाण्याची टाकी आणि पायाऱ्यांची विहिर बांधली जी आजही किल्ल्यावर अस्तित्वात आहे.

अद्भूत आहे वास्तुकला

लोहगड किल्ल्याची बांधणी आणि लष्करी रचना फार अतुलनीय आहे. किल्ल्यात एकूण चार प्रवेशद्वार आहेत ज्यात गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महा दरवाजा यांचा समावेश होतो. हे चारही द्वार किल्ल्यात आजही असून यावर सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. किल्ल्यात एक विंचू कडा नावाने जागा आहे जिथून किल्ल्याच्या मुख्य भागांमध्ये प्रवेश करता येते. ही जागा खरोखर एका विंचूच्या डंकासारखी दिसते. इथून सह्याद्री पर्वतरांगेचे सुंदर आणि मनमोहक दृष्य पाहायला मिळते.

पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव… वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या

लोहगढला कसे जावे?

  • तुम्हाला लोहगडाला भेट द्यायची असल्यास सर्वात आधी मुंबईहून पुण्याला यावे लागेल.
  • रेल्वेने जात असल्यास मुंबईवरुन लोणावळ्याला जाणारी कोणतीही एक्सप्रेस ट्रेन पकडा आणि माळवली स्टेशनला उतरा. माळवलीहून ट्रेकिंग करत तुम्ही लोहगढावर जाऊ शकता किंवा बेस व्हिलेजपर्यंत जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी करु शकता.
  • रस्ते मार्गाने जात असल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वापर करा. इथून लोणावळ्यामार्गे बेस व्हिलेज माळवलीला जाऊ शकता.
  • विमानाने जात असल्यास मुंबई छत्रपति शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन फ्लाईट पकडू पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला जा. इथून तुम्ही टॅक्सी करु शकता.
 

Web Title: Lohagad fort history trekking guide how to visit know all the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • fort
  • Ketan Agarwal
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
1

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
2

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
4

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.