घरच्या घरी तयार करा सोप्या पद्धतीमध्ये भडंग चिवडा
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहींना काही तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. जगभरात फेमस असलेल्या कोल्हापूरमध्ये झणझणीत भडंग चिवडा तयार केला जातो. हा चिवडा चवीला तिखट असला तरीसुद्धा अनेकांना आवडतो. भडंग चिवड्याला काही भागात कुरमुऱ्याचा चिवडा असे देखील बोलले जाते. हा चिवडा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही खाऊ शकता. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे भडंग चिवडे उपलब्ध आहेत. पण विकत आणलेल्या पदार्थापेक्षा घरी तयार केलेला पदार्थ चवीला अधिक सुंदर होतो. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत भडंग चिवडा कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत भडंग बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)