साहित्य :
अंजीर – २०० ग्रॅम
साखर – ३०० ग्रॅम
बदाम – १०० ग्रॅम
वेलची – ५ ग्रॅम
खवा – ५०० ग्रॅम
कृती :
खवा आणि साखर कढईत एकत्र भाजून घ्या. अंजीरचे बारीक तुकडे करून ते पाण्यात भिजवा. भाजलेल्या खव्यात अंजीरचे तुकडे मिसळा आणि नीट मळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बदामाचे तुकडे घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये घालून एकजीव करून घ्या. हे मिश्रण मऊ होईपर्यंत आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. रिकाम्या ताटात हे मिश्रण ओता आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडा आणि मग वरून वेलचीची पूड पेरून घ्या.