हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बनवा कपभर ड्रायफ्रुटपासून पौष्टिक बर्फी
रोजच्या आहारात पौष्टीक पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात फळे, भाज्या, अंडी, हिरव्या पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला पोषण मिळते. शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आहारामध्ये डाळी आणि सुका मेवा यांचा आवर्जून समावेश करावा. सकाळी उठल्यानंतर अनेकदा आपल्याला खूप भूक लागते. भूक लागल्यानंतर नेमका कोणता पदार्थ खावा असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. काही घरांमध्ये सकाळी उठल्यानंतर लहान मुलांना खजूर, भिजवलेले बदाम खायला दिले जातात. ड्राय फ्रुट खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते. तसेच भूक लागल्यानंतर ड्राय फ्रुट खाल्ल्यास लवकर भूक लागत नाही.
हाडांची ताकद वाढवण्यासाठी आहारात ड्रायफ्रूटचे सेवन करावे.काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड या ड्रायफ्रुटमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे, प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. सकाळी उठल्यावर हे ड्रायफ्रूट खाल्ल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. पण काही लोकांना ड्राय फ्रुट खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही त्यांना ड्रायफ्रूटपासून बनवलेली बर्फी खायला देऊ शकता. ही बर्फी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. चला तर जाऊन घेऊया कपभर ड्रायफ्रुटपासून बर्फी बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केसांची वाढ होत नाही? तर खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केस दिसतील चमकदार

हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बनवा कपभर ड्रायफ्रुटपासून पौष्टिक बर्फी






