उन्हाळ्यात थंड पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पण सतत थंड पाणी पिण्याऐवजी वेगवेगळी सरबत किंवा इतर थंड पेय प्यायली पाहिजेत. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. उन्हाळ्यामध्ये सरबत आणि थंड पदार्थ खायला सगळ्यांचं आवडत. सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळून शरीरातील उष्णता कमी होईल. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याचे काम सरबत करते. सरबत पिण्यासोबतच शरीराला पाणीसुद्धा महत्वाचे आहे. पण अनेकांना सतत पाणी किंवा ताक, लस्सी पिऊन कंटाळा येतो. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला असे काही रिफ्रेशिंग ड्रिंक सांगणार आहोत जे घरी बनवण्यासाठी सोपे आहेत. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात पिण्यासाठी रिफ्रेशिंग ड्रिंक..
उन्हाळ्यात पिण्यासाठी रिफ्रेशिंग ड्रिंक:
टरबूज नारळ पाणी सरबत:
टरबूज नारळ पाणी सरबत बनवण्यासाठी सोपे आहे. टरबूजाचा रस नारळ पाण्यात मिक्स केल्याने त्याचे छान सरबत बनते. या सरबताच्या चवीसोबतच आरोग्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. हे सरबत तुम्ही सहज घरी बनवू शकता.
कैरीचे सरबत:
उन्हाळ्यात बाजारामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कैऱ्या उपलब्ध असतात. या कैरीपासून तुम्ही सरबत बनवू शकता. यामुळे आरोग्याला देखील फायदे होतील. कच्चा आंबा, पुदिना, मीठ आणि साखर मिक्स करून सरबत बनवले जाते. हे आंबट गोड सरबत सगळ्यांचं आवडेल.
[read_also content=”तूप साखरेचा वापर न करता घरी बनवून पाहा खोबऱ्याचे लाडू https://www.navarashtra.com/lifestyle/try-making-coconut-ladoo-at-home-without-using-ghee-or-sugar-539104.html”]
संत्र्याचे सरबत:
ऑरेंज सरबत सगळीकडे प्रसिद्ध आहे. शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात संत्र्याचे सरबत बनवले जाते. संत्र्याचे सरबत बनवण्यासाठी संत्र्याचा रस, पाणी, मीठ आणि साखर मिक्स करून सरबत तयार होते. तुम्हाला हवे असल्यास त्यात बर्फाचे खड्डे देखील टाकू शकता.
नारळ पाणी शेक:
उन्हाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायले जाते. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. नारळाचे पाणी ब्लेंडरमध्ये टाकून शेक करून याचे सरबत बनवले जाते. यामुळे शरीराला ऊर्जा आणि थंडावा मिळतो.