कोरियन महिलांच्या त्वचेचे रहस्य
जगभरातील सर्वच महिलांना कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी आहे. कोरियन महिलांचे स्किन केअर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. कोरियन महिला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. या महिला त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्टवर किंवा इतर सौंदर्य उत्पादनावर विश्वास न ठेवतात, तांदळाच्या पाण्यावर अधिक विश्वास ठेवतात. सुंदर आणि गोरीपान त्वचा मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात, मात्र तरीसुद्धा त्वचेवर काहीच फरक दिसून येत नाही. अशावेळी तुम्ही सुद्धा घरगुती उपाय करून त्वचेचे सौंदर्य अधिक वाढवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सुंदर त्वचेसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करावा? आणि तांदळाच्या पाण्याचे त्वचेला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कोरियन महिला सुंदर त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. कारण यामुळे त्वचा स्वच्छ आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. हे पाणी वापरल्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. शिवाय चेहऱ्यावरील डाग, मुरुम, वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा.
वाढलेले वजन कमी करण्यसाठी अनेक महिला प्रोटीन पावडरचे सेवन करतात. मात्र या पावडरचे सेवन करण्याऐवजी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाच्या पाण्यात कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे झपाट्याने वाढलेले वजन कमी होते. शिवाय दैनंदिन आहारात तांदळाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, भूक कमी लागून पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तांदळाच्या पाण्याचा वापर तुम्ही टोनर म्हणून सुद्धा करू शकता. यामुळे त्वचा फ्रेश आणि ताजी राहते. तांदळाचे पाणी टोनर म्हणून लावल्यास त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. तांदळाच्या पाण्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा चांगली दिसते. तसेच तांदळाच्या पाण्याचा वापर तुम्ही केसांसाठी सुद्धा करू शकता. केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे कोरियन महिला दैनंदिन वापरात तांदळाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.