मनीष मल्होत्रा ने केली नितीन अंबानींच्या 'त्या' साडीचा कौतुक; काय आहे वैशिष्ट्ये? (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
मुकेश अंबानीच्या पत्नी नीता अंबानी नेहमी आपल्या लूक्समुळे चर्चेत असते. ड्रेस पासून ते साडी, कॅज्युअल कुर्तापासून ते वजनदार भरतकाम केलेला लेहंगा, हे सर्व पारंपरिक पद्धतीचे पोषाख नीता अंबानी अतिशय सहजरित्या कॅरी करतात. त्या साडी मध्ये असलेले मॅसेज असो किंवा त्याचा कापड अश्या अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. आता नुकताच डिझाइनर मनीष मल्होत्राने नीता अंबानी सोबत एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
चेहऱ्यावर आलेले व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, चेहरा दिसेल कायम स्वच्छ
मनीष मल्होत्रा नेहमी आपल्या कपड्यांच्या डिझाईनमुळे चर्चेत असतो. त्याने अनेक मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींचे कपडे डिझाईन केले आहे. आता नुकताच त्याने नीता अंबानी सोबत एक फोटो पोस्ट केला आहे. डिझाइनर मनीष मल्होत्राने नीता अंबानीची साडी डिझाइन केली. या साडी ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नीता अंबानीने वंतराच्या उदघाटनप्रसंगी साडी डिझाईन केली आहे. ती साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे. त्या साडीचे जर वैशिष्ट्ये बघायला गेलं तर त्या साडी मध्ये नाईन फिगर्स अडताळा डिझाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकर्षक नऊ-मोटिफ डबल इकत पटोला साडीमध्ये आहे. @rajshrungarsarees कडून घेतलेल्या आणि क्लिष्ट रेझिस्ट-डायिंग तंत्राचा वापर करून विणली आहे. या साडीला तयार करायला ७ महिने लागले आहेत. यात सात कारागिरांनी अत्यंत काटेकोरपणे काम केले आहे.
अनंत अंबानीं यांनी स्थापन केलेले वनताराचा उदघाटन ४ मार्चला पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडला. जंगली प्राण्यांचा पुनर्वसन करणाऱ्या वनतारा प्रकल्प तयार केला आहे. अनंत अंबानींचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो यशश्वीरित्या पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प गुजरात मध्ये आहे. याच प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी नीता अंबानीने मनीष मल्होत्रा डिझाईन साडी नेसली होती. डिझाइनर मनीष मल्होत्रा ने नीता अंबानी सोबत फोटो पोस्ट करत नीता अंबानींच्या साडी बाबत सांगितले आहे.
काय आहे पोस्ट?
नीता सोबत काम करणे नेहमीच सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट असते. तिचे लूक डिझाइन करणे, तिचे क्युरेट करणे. ती भारतीय हातमाग आणि कापडांना सतत पाठिंबा आणि प्रेम देऊन आण नेहमीच जागतिक व्यासपीठावर त्यांचे प्रदर्शन करणे प्रेरणास्थान आहे.
वंताराच्या उद्घाटनप्रसंगी, सौ.नीता अंबानी पारंपारिकपणे नाइन फिगर्स अडताळा डिझाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकर्षक नऊ-मोटिफ डबल इकत पटोला साडीमध्ये नीता मुकेश अंबानींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. @rajshrungarsarees कडून मिळवलेल्या आणि क्लिष्ट रेझिस्ट-डायिंग तंत्राचा वापर करून विणलेल्या या उत्कृष्ट साडीला सात महिने लागले, सात कारागिरांनी तिचे नमुने अत्यंत काटेकोरपणे तयार केले. तिने या लूकमध्ये एक उत्कृष्ट अंगठी आणि गणेशाचा हार घातला होता, दोन्हीही अत्यंत दुर्मिळ शंख मोत्यांनी बनवलेले होते.
दुसऱ्या एका लूकमध्ये, तिने @swadesh_online वरून हाताने विणलेल्या मुर्शिदाबाद सिल्क साडीत सुंदरता दाखवली. बंगालच्या समृद्ध कापड वारशाला आदरांजली म्हणून, या साडीत पारंपारिक हँड ब्लॉक प्रिंटिंग आहे, जे भारतीय कारागिरीबद्दलच्या तिच्या खोल कौतुकाचे उदाहरण आहे. वारसा आणि कलात्मकतेचा खरा संगम! अशी पोस्ट मनीष मल्होत्रा करत साडी आणि नीता अंबानींचा कौतुक केला आहे.
यकृतासंबंधित आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, घरगुती उपाय करून आरोग्याची घ्या काळजी