मुळात येवल्याची असल्याने प्रत्येक नवरात्री मध्ये मूळ असलेल्या येवल्याच्या जगदंबा माता मंदिर कोट्टमगा इथे तेजस्विनी नक्की जाते. तिच्यासाठी हे श्रद्धास्थान असून इथे मागितलेली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते असंही तिने सांगितले आहे. नवसाची देवी असलेली ही माता जगदंबा कायम सगळ्यांचं रक्षण करते आणि तेजस्विनीने नुकताच मंदिराचा प्रवास सुरू केला आहे, ज्यात तिने याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी केलेला खास लुक नक्की पहा (फोटो सौजन्य - Instagram)
नऊ दिवसाची अनोखी ऊर्जा दाखवत तेजस्विनीने नवरात्री उत्सवात नऊ रंगाच्या साडीत छान फोटो शूटदेखील केलं आहे. फॅशन लाईफ स्टाईल यांना एक सणाचा मॉर्डन टच देऊन तिने हे सुंदर फोटो शूट केलं आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या चर्चेत आहे ती तिच्या यूट्यूब चॅनल मुळे अभिनयाचा सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या यूट्यूब चॅनल मधून तिने महाराष्ट्रा मधल्या मंदिरांचा प्रवास सुरू केला आहे आणि नवरात्री निमित्तानं तिने येवलामधल्या एका खास मंदिराला भेट दिली आहे.
येवल्याच्या जगदंबा माता मंदिर कोट्टमगा इथे नक्की जाते आमच्या साठी हे श्रध्दा स्थान आहे असं म्हणतात की इथे मागितलेली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते. तेजस्विनीने यावेळी तिथे भेट दिली
तेजस्विनीचा हा जांभळ्या साडीतील लुक कमालीचा आकर्षक आहे आणि एखाद्या देवीचाच भास होत आहे. सिल्व्हर काठ असणारी ही नऊवार साडी कमाल दिसत असून तेजस्विनीने उत्तम आणि आकर्षक लुक केलाय
तेजस्विनीने यासह मोती आणि पाचूजडित दागिने घातले असून महाराष्ट्रीयन लुकमध्ये चाहत्यांना क्लिन बोल्ड केले आहे आणि याशिवाय तिचा सटल मेकअपही अत्यंत आकर्षक दिसून येत आहे
अभिनेत्री असलेल्या तेजस्विनी ने स्वतःचा हा निर्मिती विश्वातला प्रवास देखील सुरू केला असून येणाऱ्या काळात ती कोणत्या नवीन भूमिका मध्ये दिसणार आहे हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे