गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येणे फार सामान्य गोष्ट आहे. पण सामान्य वाटणारी ही गोष्ट महिलांसाठी त्रासदायक ठरत असते. आपल्या शरीरावर दिसून येणारे हे स्ट्रेच मार्क्स साैंदर्याचे आड येण्याचे कारण बनते. हे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सचाही वापर केला जाऊ शकतो पण आज आम्ही तुम्हाला यासाठीचा एक सोपा, स्वस्त आणि परवडणारा असा उपाय सांगणार आहोत ज्याच्या वापराने घरच्या घरीच तुमच्या शरीरीवरील नकोसे ठरणारे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यास मदत होईल.
प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा
एलोवेरा जेलच्या वापराने शरीरावरील स्ट्रेच मार्क्स सहज दूर करता येतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या ठिकाणी हा जेल लावून हलक्या हातांनी मसाज करु शकता.
गरोदरपणात आलेले स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी हळद आणि चंदनाचा देखील वापर करु शकता. यासाठी दोन्ही साहित्य एका भांड्यात मिसळा आणि हलकं पाणी टाकून याची एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा आणि सुकल्यानंतर काहीवेळाने पाण्याने धूवून काढा.
स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी मधाचाही वापर केला जाऊ शकतो. मधामध्ये आढळून येणारे अँटीसेप्टिक गुणधर्म स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत करतात.
याशिवाय घराघरांत उपलब्ध असलेलं नारळाचं तेल देखील स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यासाठी प्रभावी उपाय ठरतो. नारळाच्या तेलाने तुम्ही त्या भागाची मसाज करु शकता.
शरीरावरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी शेवटचा घरगुती उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑइलची मसाज. याचा रोज वापर केल्याने काही दिवसांतच स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होईल.