Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anxiety cases surge India: तीन दशकांत वाढली १२३ टक्क्यांनी वाढला ‘हा’ आजार? तुम्ही तर नाही या विळख्यात

Anxiety cases surge : स्ट्रेस (तणाव) तणाव ही एखाद्या बाह्य कारणामुळे (उदा. ऑफिसचे काम, परीक्षा किंवा आर्थिक समस्या) निर्माण झालेली मेंदूची तात्कालिक प्रतिक्रिया असते. ते मूळ कारण संपताच स्ट्रेस देखील नष्ट होती.

  • By anuradha sagar
Updated On: May 25, 2026 | 05:00 PM
Anxiety cases surge India Lancet report, mental health crisis among Indian youth,

Anxiety cases surge India Lancet report, mental health crisis among Indian youth,

Follow Us
Follow Us:
  • तीन दशकांमध्ये एंग्झायटीच्या प्रकरणांमध्ये १२३.५ टक्क्यांची धक्कादायक वाढ
  • मानसिक आजारांचा सर्वाधिक भार हा १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरुणांवर
  • गंभीर नैराश्य विकाराच्या (मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर) प्रकरणांमध्येही मोठी वाढ
Anxiety cases surge India Lancet report :   धावपळीचे जीवन, भविष्यातील असुरक्षितता आणि कोविड-१९ नंतर बदललेली सामाजिक परिस्थिती यामुळे मानसिक आरोग्याचे संकट अधिक गडद झाले आहे. कधीकाळी केवळ किरकोळ अस्वस्थता मानली जाणारी ‘एंग्झायटी’ म्हणजेच घबराट किंवा काळजी आता तरुण पिढीसाठी एक मोठे आव्हान बनली आहे.

‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकाच्या अहवालानुसार, भारतात गेल्या तीन दशकांमध्ये एंग्झायटीच्या प्रकरणांमध्ये १२३.५ टक्क्यांची धक्कादायक वाढ नोंदवली गेली आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, देशात प्रति लाख लोकसंख्येमागे मानसिक आजारांचा सर्वाधिक भार हा १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरुणांवर आहे. शिक्षण, करिअर आणि नात्यांमधील दबाव त्यांच्या मानसिक स्थितीवर सातत्याने परिणाम करत आहे. महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ

एंग्झायटी व स्ट्रेस मधील फरक

स्ट्रेस (तणाव) तणाव ही एखाद्या बाह्य कारणामुळे (उदा. ऑफिसचे काम, परीक्षा किंवा आर्थिक समस्या) निर्माण झालेली मेंदूची तात्कालिक प्रतिक्रिया असते. ते मूळ कारण संपताच स्ट्रेस देखील नष्ट होती.

एंग्झायटी (घबराट/चिंता): कोणतेही बाह्य कारण नसतानाही मनात सातत्याने भीती किंवा घबराट राहणे म्हणजे एंग्झायटी होय. एखाद्या ‘बॅकग्राउंड म्यूझिक सारखी मनात सतत घोंगावणारी ही अस्वस्थता दैनदिन कामे करणेही कठीण करून टाकते.

जगभरात मानसिक आरोग्य समस्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, ही बाब आता जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान बनली आहे. University of Queensland यांच्या सहकार्याने आणि Institute for Health Metrics and Evaluation (IHME) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जगभरात अंदाजे १.२ अब्ज लोक विविध मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत.

अभ्यासानुसार, ही संख्या १९९० च्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. २०२३ पर्यंत उपलब्ध आरोग्य संसाधनांची पर्वा न करता मानसिक विकार सर्व देशांमध्ये मोठा आरोग्य भार निर्माण करत असल्याचे निष्कर्षांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मानसिक विकार आता जागतिक स्तरावर अपंगत्वाचे प्रमुख कारण बनले असून, त्यांनी हृदयरोग, कर्करोग आणि स्नायू व हाडांशी संबंधित (मस्क्युलोस्केलेटल) आजारांनाही मागे टाकल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

तीव्र उष्णतेचा लहान मुलांसह वयस्कर लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या याबद्दल तज्ज्ञांनी दिली माहिती

चिंतेसह इतर मानसिक विकारांमध्येही वाढ

चिंतेच्या विकारांबरोबरच भारतीयांमध्ये इतर मानसिक विकारांचे प्रमाणही वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

१९९० मध्ये दर १ लाख लोकांमागे स्किझोफ्रेनियाची ३१६ प्रकरणे नोंदली गेली होती. ही संख्या २०२३ मध्ये वाढून ३२१ वर पोहोचली आहे.

तर गंभीर नैराश्य विकाराच्या (मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर) प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. १९९० मध्ये दर १ लाख लोकांमागे २,१४७ प्रकरणे होती, ती २०२३ मध्ये २,७९९.६ पर्यंत वाढली.

दीर्घकालीन नैराश्य मानल्या जाणाऱ्या डिस्थायमियाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली असून, १९९० मध्ये दर १ लाख लोकांमागे ९०२ प्रकरणे होती, ती २०२३ मध्ये ९४८ पर्यंत पोहोचली आहेत.

कोविडनंतर मानसिक समस्यांमध्ये वाढ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड-१९ महामारीनंतर चिंता आणि नैराश्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली, पर्यावरणीय परिस्थिती, वाढलेली स्पर्धा आणि मानसिक आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता यामुळे प्रकरणांची नोंद अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि Queensland Centre for Mental Health Research येथील सहयोगी प्राध्यापक Damian Santomauro यांनी सांगितले की, कोविड महामारीशी संबंधित दीर्घकालीन ताण, गरिबी, असुरक्षितता, गैरवर्तन, हिंसाचार आणि सामाजिक संबंध कमी होणे यांसारख्या कारणांमुळे मानसिक आरोग्य समस्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

१५ ते १९ वयोगट सर्वाधिक प्रभावित

अभ्यासातील निष्कर्षांनुसार, १५ ते १९ वयोगटातील युवकांमध्ये मानसिक आरोग्य समस्यांचा भार सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, या वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी मानसिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक, उपचारांची सुलभ उपलब्धता आणि उच्च-जोखीम गटांसाठी विशेष आधारव्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

 

 

Web Title: Mental health crisis deepens anxiety cases surge by 1235 in india reveals lancet study

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • lifestye
  • mental health
  • Mental Illness
  • mental stress

संबंधित बातम्या

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
1

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
2

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.