फोटो सौजन्य - Social Media
मानसिक आरोग्य हे इतर आरोग्यावरून वेगळे असते. शारीरिक आजार दिसून येतात. परंतु, मानसिक आजार कधीच दिसून येत नाही. जरी बाहेरून व्यक्ती आनंदित दिसत असला तसेच अतिशय आकर्षक दिसत असला तरी आतून तो व्यक्ती पूर्णपणे तुटलेला असतो. त्याचे मानसिक आरोग्य बिकट झालेले असते, याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मानसिक आरोग्य बिघडल्यामुले अनेक गोष्टी घडल्या आहेत. एखाद्या गोष्टीवर लक्ष देणे कठीण होते. मानसिक आरोग्याविषयी असलेल्या आजारपण आधी काही संकेत देतात.
काही दिवसांपूर्वी चेन्नईतील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने कामाच्या ताणामुळे आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे, पुण्यातील एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर मुलीनेही आत्महत्या केली होती. ही काही मोजकी प्रकरणं नसून सोशल मीडिया अशा घटनांनी भरलेला आहे. मानसिक आरोग्य बिघडण्याची काही लक्षणे शरीर देत असतो. चला तर मग त्यांना जाणून घेऊयात. सुरुवातीला एखाद्या गोष्टीवर लक्ष देणे कठीण होते. तसेच व्यक्ती निर्णय घेण्यास असक्षम ठरतो. कामे पूर्ण करण्यामध्ये असक्षम होतो. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची फार गरज असते. अनेकदा अनेक कारणांमुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो.
हे नियंत्रणात असले तर ठीक असते, परंतु गंभीर अवस्थेमध्ये याचे रूपांतर फार महागात पडते. मानसिक आरोग्य नीट नसेल तर झोप लागत नाही. झोपेची समस्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. सतत कोणत्यातरी गोष्टीची चिंता असणं आणि ताण जाणवणं मानसिक आरोग्य बिघडल्याचं द्योतक आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि गरज असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताण वाढल्यावर नातेसंबंधांपासून दूर जाणं आणि सतत एकटं वाटणं ही मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणं आहेत. हे दुर्लक्ष करू नका. हे नंतर फार महागात पडत जाते.
मानसिक आरोग्याचं महत्त्व
भारतामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. पाचपैकी एक व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असतो. योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास या समस्यांवर मात करता येते. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणं आणि त्यावर वेळेवर उपाय करणं अत्यावश्यक आहे. अनेक प्रसंग घडले आहेत, जिथे मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे लोकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसतास डॉक्टरांनाच सल्ला घेणे आणि सर्व पथ्य पाळणे कधीही उत्तम ठरते.