चांगल्या केसांसाठी मोहरीच्या तेलात मिक्स करा हे पदार्थ
हिवाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. केसांना प्रोटीन ट्रीटमेंट करून घेणे, घरगुती उपाय, हेअर मास्क, हेअर स्पा इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र या सगळ्याचा फारकाळ केसांवर प्रभाव टिकून राहत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये केस कोरडे आणि रुक्ष होऊन जातात, ज्यामुळे सतत केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी केमिकल आणि महागडे शॅम्पू किंवा इतर प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे, ज्यामुळे तुमच्या केसांना हानी पोहचणार नाही आणि केस मजबूत आणि निरोगी राहतील. केसांच्या घनदाट वाढीसाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मोहरीच्या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. शिवाय या तेलाचे इतरही अनेक फायदे आहेत. मोहरीच्या तेलात विटामिन ए, डी, ई इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात. मोहरीचे तेल स्काल्पसाठी अतिशय प्रभावी आहे. आठवड्यातून एकदा मोहरीच्या तेलाने केसांना मसाज केल्यास केसांची वाढ चांगली होते आणि रक्तभिसरण सुधारते. आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, ज्यामुळे केसांना फायदे होतील याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया .
केसांच्या घनदाट वाढीसाठी मोहरीच्या तेलात कलौंजीच्या बीया मिक्स करून केसांना लावाव्यात. यामुळे केस गळती थांबून आराम मिळेल. या बियांमध्ये खनिज, अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे या बियांचा वापर केसांच्या वाढीसाठी करू शकता. कलौंजीच्या बियांमध्ये केसांचा नैसर्गिक काळा रंग अधिक काळ चांगला टिकून राहतो. मोहरीच्या तेलात कलौंजीच्या बिया गरम करून घ्या. त्यानंतर तेल थंड करून केसांवर मसाज करा. यामुळे केस गळतीची समस्या कमी होईल आणि केसांची गुणवत्ता सुधारेल.
नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले मेथी दाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. मोहरीच्या तेलात मेथी दाणे भिजत ठेवून त्यानंतर तेल गरम करून केसांना लावा. यामुळे केसांची वाढ झपाट्याने होईल आणि केस सुंदर दिसतील. दाण्यांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी, एंटी फंगल गुण, फ्लेवेनॉई्ड्स गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे टाळूवरील कोंडा कमी होतो.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
केसांच्या घनदाट आणि सुंदर वाढीसाठी तुम्ही मोहरीचे तेल केसांना वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता. मोहरीचे तेल नियमित केसांना लावल्यामुळे केसांची वाढ होईल आणि केस काळेभोर दिसतील. दही, मध, एलोवेरा, मोहरीचे तेल मिक्स करून तुम्ही हेअर मास्क तयार करून केसांना लावू शकता. यामुळे केस मऊ आणि सुंदर होतील.






