मुलायम केसांसाठी दह्यात 'हे' पदार्थ मिक्स करून लावा
निरोगी आरोग्यासाठी आहारात दह्याचे सेवन करतात. दह्याचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आहारात ताक, दही किंवा थंड पदार्थ खाल्ले जातात. पण दह्याचा वापर केसांच्या निरोगी आरोग्यसाठी सुद्धा केला जातो. निरोगी केसांसाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. दहीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस मऊ आणि सिल्की होतात. दह्यामध्ये अँटी – फंगल गुणधर्म असतात, जे टाळूवरील इन्फेक्शन आणि कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सिल्की आणि मुलायम केसांसाठी दह्यामध्ये कोणता पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा
मेथी दाण्यांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसाच वापर केसांच्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. केसांसंबधित समस्या दूर करण्यासाठी मेथी दाणे वापरावे. यासाठी मेथी दाण्यांची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांना लावा. केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावून झाल्यानंतर अर्धा तास तसेच ठेवून घ्या. केस कोरडे झाल्यानंतर सहा,शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या केसांमधील चमक वाढण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: प्रियांका चोप्राने सांगितले गुलाबी ओठांचे रहस्य,घरी बनवून पहा होममेड लिप स्क्रब
मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा
केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मधाचा वापर केला जातो. मध हे मॉइश्चरायझरप्रमाणे केसांवर काम करते. बिघडलेल्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी दह्यामध्ये मध मिक्स करून केसांना लावा. केसांच्या मुळांना दह्याचे मिश्रण लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे टाळूवरील कोंडा आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल.
मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा
त्वचा आणि केसांच्या आरोग्यसाठी मधील अनेक वर्षांपासून कोरफड जेलचा वापर केला जातो. केसांच्या घनदाट वाढीसाठी केसांना कोरफड जेल लावणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तुम्ही दह्यामध्ये कोरफड जेल मिक्स करून केसांना लावू शकता. दही आणि कोरफड जेलचे मिश्रण तयार केल्यानंतर केसांना व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर ३० मिनिटं केस कोरडे होण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा.
हे देखील वाचा: ओठांभोवतीची त्वचा तुमचीसुद्धा काळी पडते का? जाणून घ्या कारण
मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा
एका वाटीमध्ये दही घेऊन त्यात आवळा पावडर मिक्स करा. जाडसर मिश्रण तयार केल्यानंतर केसांना सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर ३ मिनिटं हलक्या हाताने केसांवर मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर केस कोरडे होण्यासाठी तसेच ठेवा. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.