सकाळी उठल्यानंतर सतत शिंका येतात? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
सतत शिंका येण्याची कारणे?
नाक स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे नाकातून पाणी येणे, सर्दी खोकला, घशात खवखव, जळजळ होणे, उठल्यानंतर सतत शिंका येणे इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. धूळ, धुळीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा परागकण यांच्या संपर्कात राहिल्यानंतर वारंवार शिंका किंवा नाकातून सतत पाणी येण्यास सुरुवात होते. शिंका येण्याची समस्या घरातील अस्वच्छता, घरातील खिडीक्यांवरील घाणीमुळे सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. सर्दी झाल्यानंतर भूक, तहान संवेदना न जाणवता डोकेदुखी किंवा नाक चोंदण्याची समस्या उद्भवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वारंवार शिंका येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
धूळ, माती किंवा घाणीच्या संपर्कात आल्यामुळे वारंवार शिंका येण्याची शक्यता असते. याशिवाय घशात जळजळ किंवा नाकातून सतत पाणी येते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरातील बेड, खिडक्या आणि संपूर्ण घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे. याशिवाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बेडवरील चादर, उशीचे आणि गादीचे कव्हर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे धुळीचे कण नष्ट होतील.
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना कायमच सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सतत वाफ घ्यावी. यामुळे नाकातील अडथळे दूर होतात आणि एलर्जन्स बाहेर पडण्यास मदत होते. तसेच सकाळी उठल्यानंतर मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ करावे. यामुळे नाकात चिकटून राहिलेले कण बाहेर पडून जातात.
सकाळी उठल्यानंतर थंड हवेच्या संपर्कात थेट जाऊ नये. घरातील खिडक्या आणि दरवाजा बंद ठेवावा. त्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्यावी. यामुळे नाकातील विषाणू बाहेर पडून जातील आणि नाक स्वच्छ होईल. तसेच सकाळी उठल्यानंतर नियमित ३० मिनिटं प्राणायाम करणे आवश्यक आहे. योगासने केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे कायमच आहारात सहज पचन होणाऱ्या हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय विटामिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य निरोगी राहते. तुम्हाला जर वारंवार शिंका येत असतील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: धूळ, बुरशी, पाळीव प्राण्यांचा कोंडा, परागकण.
Ans: ऍलर्जीमुळे शिंका येत असल्यास डॉक्टर अँटीहिस्टामाइन्सची शिफारस करू शकतात.
Ans: हिवाळ्यातील कोरडी हवा आणि लोक घरामध्ये जास्त वेळ एकत्र घालवत असल्यामुळे विषाणू सहज पसरतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.






