गुरु शिष्यांची कमाल! प्लॉस्टिक बॉटलपासून बनवलं रॉकेट, चीनमधील Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चीनमधील असून यामध्ये गुरु-शिष्यांनी मिळून रॉकेट्स तयार केले आहे. हे रॉकेट प्लास्टिकच्या बॉटलपासून तयार करण्यात आले असून त्याला उडवण्यासाठी पाण्याच्या दाबाचा वापर केला आहे. सध्या या अनोख्या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिनी मुलांनी प्लॅटस्टिकच्या बाटल्यांपासून भन्नाट रॉकेट तयार केले आहे. हे रॉकेट बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि घरगुती संसाधनांचा वापर केला आहे. पाणी आणि हवेच्या दाबाचा वापर करुन हे रॉकेट उंचावर गेले आहे. अगदी खऱ्या रॉकेटसारखे रॉकेटचे उड्डाण दिसत आहे. सध्या सर्व या मुलांचे आणि शिक्षकाचे कौतुक केले जात आहे.
व्हायरल व्हिडिओ
A teacher and his students in Jiangxi, China, built a two stage rocket using plastic bottles powered by water pressure. 🚀 pic.twitter.com/ENfFgkTMFS — Moments that Matter (@_fluxfeeds) December 26, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी गुरु-शिष्याच्या जोडीचे भरभरुन कौतुक केले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी भारतातील मुले देखील काही कमी नाहीत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






