सडलेले लिव्हर होईल पुन्हा एकदा बरे! 'या' पदार्थांच्या सेवनामुळे लिव्हरमध्ये वाढलेली चरबी होईल नष्ट
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. सतत आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन,धूम्रपान, अपुरी झोप, सतत बिघडणारी पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते. लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात बाहेरील पदार्थांचे सेवन करू नये. कमीत कमी प्रमाणात जंक फूड खाऊन आहारात हेल्दी पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस किंवा लिव्हर आतून सडण्यास सुरुवात होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हार्वर्ड-प्रशिक्षित लिव्हर डॉक्टरांनी लिव्हर पुन्हा एकदा बरे करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. या पदार्थांचे सेवन रोजच्या आहारात केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. यामुळे लिव्हरमध्ये वाढलेली अनावश्यक चरबी कमी होईल आणि शरीराला आराम मिळेल.
रोजच्या आहारात ड्रायफ्रूटचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. त्यामुळे आहारात खजूर आणि अक्रोडचे सेवन करावे. यामध्ये असलेले घटक शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. अक्रोडमध्ये आढळून येणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स लिव्हरमधील सूज कमी करतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अक्रोड आणि खजूर खावेत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे लिव्हरमध्ये वाढलेली चरबी काही दिवसांमध्येच नष्ट होईल आणि लिव्हरचे आरोग्य सुधारेल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप आवडते. चॉकलेट खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात चॉकलेट खाल्यामुळे दात किडू लागतात. त्यामुळे नियमित एक तुकडा डार्क चॉकलेट खावे. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात पॉलीफेनोल्स असतात, ज्यामुळे लिव्हरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून बचाव होतो. चॉक्लेटमधील काजू, बदाम किंवा अक्रोड खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर कायमच निरोगी राहते.
महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी! हाडांच्या वेदना, बद्धकोष्ठता होईल कमी
भारतीय मसाल्यांचा वापर जेवणातील पदार्थ बनवतना केला जातो. या मसाल्यांमधील सुगंध, चव सगळ्यांचं खूप जास्त आवडते. जेवणाची चव वाढवण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा मसाला म्हणजे दालचिनी. मधात दालचिनी पावडर मिक्स करून खाल्यास लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी कमी होईल आणि लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. दालचिनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.