फोटो सौजन्य: AI
या जगात मांसाहार आणि शाकाहारी अशा दोन पद्धतीची मंडळी राहतात. सध्याच्या जगात मांसाहार खाणारे जितक्या प्रमाणात आहे तेवढंच शाकाहारी मंडळींचं प्रमाण देखील आहे. अशातच आता ही माहिती खास शाकारीप्रेमींसाठी आहे. रोज सकाळी उठल्यावर तुम्ही ज्या टुथपेस्टने ब्रश करता ती टुथपेस्ट मांसाहारी आहे असं सांगितलं तर ? हो आपण वापरत असलेली टूथपेस्ट ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन विभागांमध्ये येते. कसं ते जाणून घेऊयात.
सकाळी उठल्यावर पहिल काय गरजेचं आहे ते म्हणजे टूथपेस्ट. त्यामुळे आपण वापरत असलेली ही टूथपेस्ट व्हेज की नॉन हे माहित असणं गरजेचं आहे.
आपल्याला वाटतं की टूथपेस्ट म्हणजे केवळ तोंड साफ करण्यासाठी वापरण्यात येणारी एक साधी गोष्ट, पण वास्तवात तीचे घटक पाहिले तर काही टूथपेस्ट मांसाहारी पदार्थांपासून बनलेल्या असू शकतात. होय, टूथपेस्टसुद्धा नॉनव्हेज असू शकते, आणि त्यामुळेच ते माहित असणं गरजेचं आहे.
दातांच्या आरोग्यासाठी टूथपेस्टमध्ये काही घटक मिसळले जातात. दातांची हाडे मजबूत रहावी म्हणूनच टूथपेस्टमध्ये विविध रासायनिक घटक वापरले जातात. टूथपेस्टला मऊ आणि ओलसर राहण्यासाठी ग्लिसरीन वापरले जाते. बहुतांश हे ग्लिसरीन जनावरांच्या चरबीपासून देखील तयार केले जाते. बहुतांश हे ग्लिसरीनवनस्पतीजन्य असते.
काही टूथपेस्टमध्ये स्टेरिक अॅसिड (Stearic Acid) नावाचा घटक असतो. हे देखील प्राण्यांच्या चरबीपासून तयार केले जाते. टूथपेस्टमध्ये थर तयार करण्यासाठी वापरले जाते.जिलेटिन (Gelatin): काही टूथपेस्टमध्ये जेलसारखी रचना मिळवण्यासाठी जिलेटिन वापरले जाते, जे मुख्यतः प्राण्यांच्या हाडांपासून तयार होते.Flavoring agents काही वेळा हे देखील प्राण्यांपासून तयार केलेले असू शकतात.
आपण वापरत असलेली टूथपेस्ट व्हेज आहे की नॉनव्हेज हे कसं ओळखावं ?
वापरत असलेली टूथपेस्ट ही व्हेज आहे की नॉनव्हेज हे ओळखण्याची सोपी ट्रीक म्हणजे पॅकिंगवर लाल किंवा हिरवा ठिपका असणं. जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल, तर टूथपेस्ट खरेदी करताना पॅकिंगवरचे चिन्ह लाल रंगाचं आहे की हिरव्या रंगाचं आहे हे एकदा तपासून घ्या.
जर टूथपेस्टवर “100% vegan”, “cruelty-free”, किंवा “not tested on animals” असे नमूद केले असेल, तर ती उत्पादनं मांसाहारी घटकांनी तयार न करता शाकाहारी उत्पादनांपासून तयार केलेली आहेत, हे समजायला सोपे जाते.