भारताचा शेजारी धर्म! जगात तेल संकट असताना बांगलादेशसाठी उघडली तिजोरी; पाइपलाइनद्वारे पाठवली ५००० टन डिझेल खेप (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
भारताने कठीण प्रसंगात बांगलादेशसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. भारताने पाइपलाइनद्वारे ५,००० टन डिझेलची पहिली खेप ढाका येथे पाठवली आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPC)चे अध्यक्ष मोहम्मद रेजानुर यांनी याची पुष्टी केली आहे. भारत-बांगलादेशमधील वार्षिक करारानुसार, भारत दरवर्षी बांगलादेशला पाइपलाइनद्वारे १,८०,००० टन डिझेलचा पुरवठा करतो. मंगळवारी (१० मार्च २०२६) ५,००० टन डिझेलची ही खेप ढाका येथे पोहचली आहे.
युद्धाच्या सावटाखाली सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. अशी कठीण परिस्थिती भारताने आपल्या शेजारी धोरणाला प्राधान्य देत पार्बतीपुर सीमेवरुन डिझेल पोहोचवले आहे. करारानुसार, येत्या दोन महिन्यांत भारताने उर्वरित डिझेलचा पुरवठा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे बांगलादेशातील ऊर्जा टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
अमेरिका-इस्रायल संघर्षाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित न राहता दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशांमध्ये इंधन दर भडकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती भारताने बांगलादेशला इंधन पुरवठा करत दक्षिण आशियात आपली भूमिका प्रभावी केली आहे.
काही तासांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली होती. तसेच त्यांनी काही देशांवरील तेल निर्बंध हटवले जातील असेही म्हटले होते. यामध्ये रशियावरील निर्बंध हटल्याल जागतिक तेल बाजारात काहीशी स्थिरता निर्माण होण्याची शक्यात आहे.
मात्र दुसरीकडे इराणमात्र युद्धावर अडून राहिला आहे. युद्ध कधी संपवायचे हे इराण (Iran) ठरवणार असे IRGC च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच होमुर्झ हा अत्यंत महत्वाचा मार्गावारुन जागतिक तेल वाहतूक रोखण्याचीही धमकी दिली आहे. यामुळे अद्यापही तेलाच्या किंमतीमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Ans: मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाचा पुरवठा कमी पडला आहे. ज्यामुळे बांगलादेशमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे.
Ans: भारताने कठीण प्रसंगात बांगलादेशसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. भारताने पाइपलाइनद्वारे ५,००० टन डिझेलची पहिली खेप ढाका येथे पाठवली आहे.






