लिव्हर कायमचे निकामी झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम सुद्धा लिव्हर करते. पण शरीरातील एका अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीची जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींमुळे शरीराचे कार्य बिघडून जाते. शरीराचे कार्य बिघडल्यानंतर ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र गोळ्या औषधांचे अतिसेवन, जंक फूड, पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींचा चुकीचा परिणाम लिव्हरच्या कार्यवाह होतो. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – iStock)
लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर रक्त शुद्ध करताना अडथळे निर्माण होतात.याशिवाय लिव्हरवर ताण येऊ लागतो. ज्यामुळे लिव्हरचे कार्य पूर्णपणे बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हर कायमचे निकामी झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पायांवर दिसून येणाऱ्या लक्षणांमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. लिव्हर निकामी झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
लिव्हरच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर शरीरातील अवयवांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यात प्रामुख्याने जाणवणारे लक्षणं म्हणजे पायांमध्ये सतत वेदना होणे. लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये सतत वेदना होऊ लागतात.चालताना किंवा वरती उठताना पाय दुखणे, पायांमध्ये वेदना होऊ लागतात. ज्यावेळी लिव्हरच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यावेळी शरीराच्या खालच्या भागात जास्त द्रव पदार्थ जमा होऊ लागतात. ज्यामुळे पायांवर दबाव येतो आणि पाय दुखतात.
लिव्हर खराब झाल्यानंतर पायांना सूज येते. पायांना आलेली सूज लवकर कमी होत नाही. लिव्हर निकामी झाल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून रहातात, ज्याचा परिणाम पायांवर लगेच दिसून येतो. पायांना सूज आल्यानंतर चालताना वेदना होतात. त्यामुळे पायांना आलेली सूज पाहून दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
शरीरात वाढलेला मधुमेह आणि लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर पायांसह संपूर्ण शरीरावर खाज येऊ लागते. शरीरावर आलेल्या खाजीमुळे त्वचा लाल होणे, लाल चट्टे उठणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. प्रायमरी बिलीरी सिरोसिस आणि प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलांगायटिस इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. लिव्हर खराब झाल्यानंतर लिव्हरमध्ये अतिरिक्त पित्त जमा होऊ लागते.यामुळे पायांना मोठ्या प्रमाणावर खाज येते.
लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवू लागतो.पायांमध्ये मुंग्या येऊ लागल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. हिपॅटायटीस सी संसर्गामुळे किंवा अल्कोहोलिक यकृतामुळे पायांमध्ये सुन्नपणा जाणवण्याची शक्यता असते.






