दातांमध्ये अडकलेले प्लाक काढण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
जर तुमच्या दातांमध्ये प्लाक अडकला असेल आणि तुम्ही तो बराच काळ स्वच्छ केला नसेल, तर तुम्हाला स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. वाचून हादरलात ना? अलिकडच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक आठवड्यातून किमान एकदा त्यांच्या हिरड्यांमध्ये अडकलेला प्लाक साफ करतात त्यांना स्ट्रोकचा धोका कमी असतो. हा अभ्यास युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसिनने केला आहे. तसंच हा अभ्यास लवकरच लॉस एंजेलिसमधील आंतरराष्ट्रीय स्ट्रोक परिषदेत सादर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. सौविक सेन म्हणतात की तोंडाचे आजार आपल्या शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करतात. ते म्हणाले, जर दात आणि हिरड्या निरोगी नसतील तर शरीरात जळजळ वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे स्ट्रोक देखील होऊ शकतो
फ्लॉसिंगमुळे स्ट्रोकचा धोका कमी

दातांची सफाई कशी करावी
दातांमध्ये अडकलेले बॅक्टेरिया आणि प्लेक काढून टाकण्याच्या प्रक्रियेला फ्लॉसिंग म्हणतात. एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की जे लोक आठवड्यातून किमान एकदा फ्लॉस करतात त्यांना रक्ताच्या गुठळ्यांमुळे स्ट्रोकचा धोका २२ टक्के कमी असतो. इतकेच नाही तर अशा लोकांमध्ये अॅट्रियल फायब्रिलेशन नावाच्या हृदयरोगाचा धोकाही १२ टक्क्यांनी कमी होतो आणि हृदयातून रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे स्ट्रोकचे प्रमाण ४४ टक्के कमी होते.
दातांचा पिवळा थर काढून टाकण्याचा रामबाण उपाय, मोत्यांसारखे होतील दात; वापरा केवळ 1 पान
फ्लॉसिंग म्हणजे काय

फ्लॉसिंग नक्की काय असते
फ्लॉसिंग म्हणजे दातांमधील जागा स्वच्छ करणे. फ्लॉसिंगमुळे तुमच्या दातांवर प्लाक जमा होण्यापासून रोखता येते. दात किडण्याचे मुख्य कारण म्हणजे प्लेक. फ्लॉसिंगचे फायदे:
आजच्या काळात लोकांमध्ये तोंडाचे आजार झपाट्याने वाढत आहेत, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. जागतिक आरोग्य अहवालानुसार, २०२२ मध्ये जगातील ३.५ अब्ज लोक दात किडणे, हिरड्यांचे आजार यासारख्या तोंडाच्या आजारांनी ग्रस्त होते. आता हा आकडा आणखी वाढू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तोंडाच्या आजारांचा आपल्या शरीराच्या अवयवांवर परिणाम होतो आणि त्यामुळे होणाऱ्या जळजळीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे वेळीच तुम्ही प्लाकच्या आणि दातांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दातांची काळजी
नियमित दातांची काळजी घेतली गेल्यास प्लाकची समस्या राहत नाही. दातांची काळजी घेताना रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी दात घासावेत. तसंच दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी फ्लॉसिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






