प्रेमानंद महाराजांनी दिला मोलाचा सल्ला
वृंदावनच्या प्रेमानंद जी महाराजांचे प्रवचन लोक खूप लक्षपूर्वक ऐकतात. प्रेमानंदजी सरळ आणि सोप्या पद्धतीने समस्या सोडवून सांगतात आणि खूपच सोपी उदाहरणे देतात, म्हणून बरेच लोक त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येतात आणि त्यांना आशा असते की त्यांना उपाय मिळेल किंवा त्यांच्या मनातील गोंधळ दूर होईल. त्यांच्या सूचनादेखील सर्वात सोप्या आहेत.
नुकतेच एका प्रवचनात एका तरुणाने प्रेमानंद जी महाराजांसोबत आपले मानसिक दुःख आणि समस्या शेअर केल्या. त्याने सांगितले की त्यांच्या कुटुंबाला त्याचे लग्न करून द्यायचे आहे, पण त्याला यामध्ये अजिबात रस नाही. समस्या अशी आहे की तो स्त्रियांकडे नाही तर पुरुषांकडे आकर्षित होत आहे आणि अशा परिस्थितीत काय करावे? यावर प्रेमानंदजी महाराजांनी त्यांना काय म्हटले? हे जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
मुलीला फसवू नकोस
प्रेमानंद जी महाराज म्हणाले की असाच दुसरा मुलगा आला, तो म्हणाला की त्याचे आईवडील त्याचे लग्न करू इच्छितात, पण त्याला मुलींबद्दल आकर्षण नाही, उलट तो मुलांबद्दल आकर्षित आहे. अशा मुलांना आम्ही विनंती करतो की, जर देवाने तुम्हाला अशी वृत्ती किंवा भावना दिली असेल तर तुम्ही कोणत्याही मुलीच्या आयुष्यात तिची फसवणूक लग्न करून करू नये. तिच्या आयुष्यात एक वेगळी गुंतागुंत निर्माण करू नये
नात्यात केवळ प्रेमच पुरेसं नाही, यशस्वी होण्यासाठी जोडीदारांमध्ये ५ गोष्टी हव्याच
मुलीचे आयुष्य नरक बनवू नका
प्रेमानंदजी पुढे म्हणाले की तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या आई आणि वडिलांसोबत शेअर करावी. तुम्ही हे लग्न अजिबात करू नये. त्या मुलीशी लग्न करून आणि तिला तुमच्या घरात ठेवून तिचे आयुष्य नरक बनवू नका. कारण लग्न हा खेळ नाही. संपूर्ण आयुष्य पणाला लावणे योग्य नाही असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी यावेळी तरूणाला दिला आहे. मुलीचे आयुष्य तर नरक होईलच पण त्यासह अनेकांना याचा त्रास होईल
प्रेमानंदजींची पालकांना प्रार्थना
यावर त्या मुलाने त्याच्या पालकांना यासंदर्भात बोलायला लाज वाटते असे सांगितले. यावर प्रेमानंद महाराज म्हणाले की, दुसऱ्याचे आयुष्य उध्वस्त करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? जर तुमच्या मनात अशा भावना असतील तर तुमच्या पालकांना सांगणे तुमच्या सन्मानावर गदा आणण्यासारखे अजिबात नाही आणि यात कोणतीही लाज नाही. पालकांनो मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे मूल काय म्हणत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा स्वभाव असा आहे, त्याला फटकारून तुम्ही त्याचा स्वभाव बदलू शकता का? नाही. तुम्ही एकमेकांना आधार दिलात तर चांगले होईल, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय.
पुरूष नात्यात का देतात धोका? फक्त लैंगिक संबंधच नाही तर ही आहेत 5 धक्कादायक कारणं
मानसिक वृत्तीवर नियंत्रण कसे ठेवावे?
महाराजांना विचारण्यात आले की अशा लोकांनी त्यांच्या मनातील या प्रवृत्तीला कसे हाताळावे. या प्रश्नावर प्रेमानंदजी म्हणाले की यावर एकमेव उपाय म्हणजे देवाची पूजा, फक्त हे हाताळता येते, अन्यथा ते खूप कठीण आहे. जर आपण ते हाताळू शकलो तर हा सर्वात मोठा विजय असेल.
हे कलियुग आहे, या काळात वेगवेगळ्या प्रथा दिसून येत आहेत, स्त्रिया स्त्रियांकडे आकर्षित होत आहेत आणि पुरुष पुरुषांकडे आकर्षित होत आहेत. अशा बंधू-भगिनींनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. तुम्ही त्या पुरूषावर वा स्त्रीवर प्रेम करत नाही आणि लग्न केले आहे तर तुम्ही त्याचा द्वेष कराल, हे आयुष्याच्या दृष्टीने खूप चुकीचे होईल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही नातेसंबंध जपले पाहिजेत; विरुद्ध नातेसंबंध निर्माण करून इतरांना दुखवू नका.
काय सांगितले प्रेमानंद महाराज यांनी