(फोटो सौजन्य: Pinterest)
पांढरेशुभ्र दात पिवळे का पडतात? जाणून घ्या डाग पडण्यामागची खरी कारणे
सकाळची तयारी रात्रीच करा
ऑफिससाठी निघण्याची घाई टाळायची असेल तर सकाळची तयारी रात्रीच करुन ठेवावी. कपडे, बॅग, लॅपटॉप, चार्जर, ओळखपत्र यांची यादी करून ती आधीच तयार ठेवली तर सकाळी गोंधळ होत नाही. शक्य असेल तर आठवड्याभरासाठी ऑफिसचे कपडे आधीच ठरवून ठेवावेत, यामुळे निर्णय घेण्याचा वेळही वाचतो. अगदी साधी गोष्ट वाटली तरी गडबड कमी होते.
आठवड्याचा मेनू ठरवा
जेवणाच्या बाबतीत नियोजन फार महत्त्वाचं आहे. आठवड्याचा मेनू आधी ठरवला तर रोज “आज काय करायचं?” या प्रश्नात वेळ जात नाही. भाज्या चिरुन, डाळी भिजवून फ्रिजमध्ये ठेवल्या तर स्वयंपाक झटपट होतो. कुकर, एअराफ्रायर, चॉपर यांसारखी साधनं वापरल्यास वेळ आणि मेहनत दोन्ही कमी लागतात. एकाच वेळी दोन पदार्थ बनवण्याची सवय लावली तर ऑफिसाहून आल्यावर थकवा कमी जाणवतो. विविध गंडझेट्स आता मिळतात त्यांचा वापर करा.
कामे वाटून घ्या
घरची कामे एकटीने करण्याऐवजी ती वाटून घेणे गरजेचे आहे. घरातल्या प्रत्येकाला जबाबदारी दिली तर कामाचा ताण कमी होतो. रोज सगळं परफेक्ट करण्याच्या नादात न पडता, काही काम अठवड्यातून एक-दोन वेळा केली तरी चालतात है लक्षात घ्या, घर स्वच्छ ठेवणं महत्वाचं असलं तरी स्वतः थकून नाही. घर ही सर्वांची जबाबदारी असते.
वेळेचे नियोजन करावे
प्रवासात वेळ वाचवण्यासाठी अवधीच मार्ग आणि वेळेचे नियोजन करावे, ऑफिसच्या वेळा थोड्या बदलता येत असतील तर गर्दी टाळणाऱ्या वेळा निवडाध्यात, प्रवासादरम्यान पॉडकास्ट, ऑडिओबुक किया ऑफिसचे छोटे काम पूर्ण करता आले तर तो वेळही उपयोगात येतो.
गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी
स्वत:साठी वेळ काढा
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वत साठी वेळ राखून ठेवणे. सगळे करताना स्वत कडे दुर्लक्ष झाल तर थकवा, चिडचिड आणि कामाचा ताण वाढती, रोज थोडा वेळ स्वत:साठी ठेवला तर मानसिक शांतता मिळते आणि पुढचा दिवस अधिक नियोजनबद्ध जातो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






