पी व्ही सिंधुचा क्लासी रॉयल लुक
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत असते. याआधी तिचे लग्न कधी आणि कुठे होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, आता 22 डिसेंबरला वेंकटची वधू बनल्यानंतरही हसीनाचे लग्न सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. नवविवाहित वधूने आता अनेक विधींचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बॉलिवूडच्या नववधूंनाही मागे टाकत आहे.
उदयपूरच्या रॅफल्स रिसॉर्टमध्ये लग्न झाल्यानंतर अवघ्या 13 दिवसांनी सिंधूने आता तिचा नवा लुक दाखवला आहे. पेस्टल रंगाच्या लेहेंग्यात ती खूप सुंदर दिसत होती, तर तिचा पती व्यंकट दत्ता देखील तिच्यासोबत धोती-कुर्ता परिधान करताना दिसला. पण, या लूकची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या ज्वेलरी आणि दुपट्ट्याला दिलेला पर्सनल टच होता, ज्यामध्ये तिचे दोन ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे वर्ष तसेच प्रेमकथा कोरली आहे (फोटो सौजन्य – पी व्ही सिंधू इन्स्टाग्राम)
हाऊस ऑफ मसाबाचे डिझाईन
पी व्ही आणि वेंकटचा लग्नाच्या विधीदरम्यान खास लुक
पीव्ही सिंधूने लग्नापासूनचे अनेक लुक शेअर केले असून नुकताच नवा लुक समोर आलाय आणि त्यात हाऊस ऑफ मसाबाचे कपडे परिधान तिने केले आहेत, तर वेंकटही मॅचिंग पोशाखात दिसला. वधूने कस्टम ‘अंबर बाग’ सी ग्रीन टिश्यू लेहेंगा परिधान केला होता, तर वर राजा कस्टम ‘अंबर बाग’ कुर्ता आणि वेष्टी (धोती) मध्ये चांगला दिसत होता. स्टायलिस्ट बोर्नाली काल्डेराने पी व्ही सिंधूची ही स्टाइल निर्माण केली आहे आणि ज्यात पी व्ही सिंधू खूपच सुंदर दिसतेय.
वेंकटच्या शॉर्ट कुर्त्यात सोनेरी बुटीज आहेत, तर पांढऱ्या धोतीची सोनेरी बॉर्डर आणि झाडांनी डिझाइन केलेली बॉर्डर डोळ्यांना खूपच आकर्षक दिसत आहे आणि त्याखाली त्याने ब्लॅक शूज घालत स्टाईल पूर्ण केलीये
दुपट्ट्याला ‘पर्सनल टच’
दुपट्ट्यावर कोरला आहे खास लुक
सिंधूने तिच्या लेहेंगासोबत चोली घालण्याऐवजी कुर्ता स्टाइलचा ब्लाउज घातला होता. ज्यामध्ये ट्यूब टॉप ग्रीन गोल्डन बुटी फॅब्रिकचा बनलेला दिसतोय, तर फुल स्लीव्हज कुर्ता ब्लाउज नेट फॅब्रिकचा तयार करण्यात आला होता. पी व्ही सिंधूने ट्री डिझाईन केलेल्या लेहेंगासोबत पेअर केले होते. यात डोरी वर्क आणि टिश्यू डिटेलिंग हेमसह डिझाईन करण्यात आले होते.
दरम्यान, गोटा आणि फॉइल तपशीलांसह बनवलेल्या त्यांच्या कस्टम टिश्यू दुपट्ट्यात बॅडमिंटन रॅकेट, शटल कॉक, गोल्ड मेडल आणि पेपर एअर प्लेन यांसारखे डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आकर्षण ठरले आहेत, जे या जोडप्याच्या प्रेमाची कहाणी सांगतात. सिंधूसाठी हा ड्रेस खास तयार करण्यात आला आहे.
मोत्यांचे दागिने
मोत्याच्या दागिन्यांमधील आकर्षक लुक
सिंधूने अगदी मायनर आणि लहानात लहान तपशीलांसह तिचा लेहेंगा खूपच खास बनवला आहे, तर तिचे दागिनेदेखील पाहण्यासारखे होते. तिने धोरा लेबलचा हाफ मून स्टाइल मोत्याचा नेकपीस आणि मॅचिंग कानातले घातले होते, तर सोनेरी हाताच्या फुलांनीही तिचा लुक वाढवला होता. पण, त्याहूनही विशेष म्हणजे तिची मसाबाने डिझाईन केलेली अंगठी, परांदा आणि ‘नंदी’ माथा पट्टी अधिक लक्ष वेधून घेत होते
लव्ह स्टोरीही समाविष्ट
पी व्ही सिंधुची लव्ह स्टोरी दागिन्यांमध्ये कैद
वास्तविक, पीव्ही सिंधूची अंगठी 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिकमधील तिच्या विजयाच्या सन्मानार्थ बनवण्यात आली होती. ज्यामध्ये हाऊस मॅस्कॉट – ‘द पाम’ दाखवला आहे. इतकेच नाही तर शटल कॉक आणि बॅडमिंटन रॅकेट सारख्या सानुकूल आकर्षणांसह तिची परांदा देखील खूप खास असून ती या लुकमध्ये एखाद्या परीप्रमाणे भासत आहे आणि या सर्व दागिन्यांमध्ये सिंधू आणि वेंकटची प्रेमकथा सांगणाऱ्या विमानातील चार्मही बसवण्यात आले होते.
हिरव्या रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचा ब्लाउज परिधान करावा? मिक्स अँड मॅच फॅशन करून पहाच