रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व असून हा सण प्रामुख्याने भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित केला जातो. यावर्षी 19 ऑगस्ट रोजी सोमवारी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तसेच यावेळी बहिणीने भावाच्या मनगटाला राखी बांधण्याची प्रथा आहे. राखी हे नात्यातील घट्टपणा बांधून ठेवण्याचे काम करते, असे म्हटले जाते.
रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ घेतो. हा सुंदर सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम दर्शवतो. या रक्षणबंधनाला जर तुमच्यासोबत तुमचा भाऊ किंवा बहीण सोबत नसेल तर चिंता करू नका कारण आज आम्ही रक्षाबंधनानिमित्त तुमच्यासाठी काही खास शुभेच्छांची लिस्ट घेऊन आलो आहोत. या गोड शुभेच्छा तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला पाठवून त्यांचा हा रक्षाबंधनाचा दिवस आणखीन गोड करू शकता.
हेदेखील वाचा – Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनला लाडक्या भावासाठी बनवा स्पेशल काजू कतली, जाणून घ्या रेसिपी
जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनात
दादा तुला भेटण्याची आस असते.
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे ,
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे ,
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा ,
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे,
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे,
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे,
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे,
मी कधीच कशाला घाबरत नाही कारण
माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आठवणींच्या हिंदोळ्यात तू कायम असते,
तू दूर असलीस तरी जवळ भासते
कितीही बिझी असलो तरी
आजचा दिवस खास तुझ्यासाठीच असतो
लाडकी ताई तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आठवण रक्षाबंधनाची
तुझ्या मनात सदैव राहो.
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडी,
अशीच आयुष्यभर राहो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!