दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य?
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे बाहेर पडून जातात. यामुळे शरीर स्वच्छ होते. लघवी होणे ही शरीरासाठी अतिशय महत्वाची क्रिया आहे. लघवीमधून शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. शरीरासाठी ही क्रिया अतिशय निरोगी आहे. मात्र बऱ्याचदा शरीराच्या चक्रात बदल झाल्यानंतर लघवीवर सुद्धा अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक कारणामुळे लघवीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य? लघवी अडकवून ठेवल्यामुळे आरोग्याला नेमकी काय हानी पोहचते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
‘हे’ पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा, चुकूनही आहारात करू नका सेवन
दिवसभरात कितीही वेळा लघवीला जाणे अतिशय सामान्य आहे. लघवी केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. व्यक्तीचे वय, पाणी पिण्याचे प्रमाण, फिजिकल अॅक्टिविटी आणि आरोग्यावर लघवी होणे अवलंबून आहे. त्यामुळे काहींना दिवसभरातून सतत लघवीला जावे लागते तर काही लोक दिवसातून तीनदा किंवा चार वेळच लघवीला जातात. याशिवाय निरोगी व्यक्ती दिवसभरातून ६ किंवा ७ वेळा लघवीला जात असेल तर ते सामान्य आहे.
उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूंमध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर लघवी करताना वेदना होणे, जळजळ होणे किंवा लघवीसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. तुम्हाला जर दिवसभरातून 10 वेळा पेक्षा जास्त वेळ लघवीला जावे लागत असेल तर हे लघवीसंबंधित गंभीर आजाराचे लक्षण आहे. याशिवाय काहींना सतत लघवीला जावे लागते. डायबिटीस, यूरिनरी ट्रॅक्ट,ओव्हरअॅअक्टिव ब्लॅडर सिंड्रोम, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ किंवा जास्त कॅफीन-लिक्विडचे सेवन केल्यामुळे लघवीसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात.
काहींना दिवसभरातून फार कमी वेळा लघवीला जावे लागते. 2 किंवा 3 वेळाच अनेक लोक लघवीला जातात. पण 3 वेळांपेक्षा कमी लघवी केल्यामुळे किडनीच्या आरोग्याला धोका पोहचतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीमधून बाहेर पडून जातात. पण कमीत कमी लघवी केल्यामुळे शरीरात विषारी तसेच साचून राहतात.यामुळे डिहायड्रेशन, किडनी फेलिअर, यूरिनरी ब्लॉकेज किंवा औषधांचे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे लघवी करताना वेदना होणे, लघवीमध्ये जळजळ होणे, रक्त येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात.