वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घरासाठी अनेक नियम सांगितले आहेत. त्याप्रमाणे घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी आणि लावण्यासाठीही काही नियम आहेत. त्यानुसार त्या शुभ आणि फलदायी ठरतात. तसेच घरात नेहमी सकारात्मकता राहते. प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला, योग्य ठिकाणी ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते. अशाच पद्धतीनं घराच्या भिंतीवरील घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम सांगण्यात आले आहेत.
घड्याळाचं घरात खूप महत्त्व असतं. त्यामुळे त्याची जागाही योग्यच हवी. घराच्या भिंतीवरील घड्याळ केवळ वेळच सांगत नाही, तर अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देते. वास्तू नियमांनुसार घड्याळाचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्यास आपले नुकसान होते. घड्याळाचा जीवनावर परिणाम होतो. घरातील बंद पडलेलं घड्याळ नकारात्मकता पसरवते. तसेच घरही घड्याळासारखे निर्जीव होते. घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घेऊया.






