5 वर्षांपूर्वी लग्न
सुषमा आणि पुनीतच ५ वर्षांपूर्वी लग्न झालं होत आणि त्यांना एक ४ वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पुनीत एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. सुषमा लग्नाआधी सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती. मात्र,लग्न झाल्यानंतर तिने आपल्या पतीसाठी नोकरी सोडल्याचे सांगितलं जात आहे. सुषमाचे वडील प्रभाकरमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून 10 लाख रुपये रोख आणि भरपूर सोन्याचे दागिने दिले होते. इतकेच नव्हे तर, सुषमाने स्वतःच्या पैशांतून एक कार देखील खरेदी केली होती. तरीही, पुनीत आणि त्याची आई कल्पना यांनी पीडितेकडे लग्नानंतर सुद्धा आणखी हुंड्याची मागणी करण्यास सुरूवात केली.
गेल्या काही महिन्यांपासून पीडितेच्या सासरी किरकोळ कारणावरून वारंवार वाद सुरु होते. रविवारी सुषमा आणि तिच्या सासूमध्ये जेवण बनवण्यावरून मोठा वाद झाला. महिलेच्या आई वडिलांचा आरोप आहे की तिची सासू तिला स्वयंपाक करण्यापासून रोखत होत्या आणि मानसिक त्रास देत होत्या. याच सततच्या छळाला कंटाळून सुषमाने आत्महत्या केली.
सुषमाच्या वडिलांनी हत्येचा संशय व्यक्त केला
सुषमाचे वडील हे पोलीस विभागात रिटायर्ड असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) असून त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात कारवाई करत सुषमाचा पती पुनीत कुमार याच्याविरुद्ध हुंडाबळी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुषमाच्या वडिलांनी तक्रारीत म्हंटले की आम्हाला संशय आहे की त्यांनी आधी सुषमाची हत्या केली आणि नंतर तिला फासावर लटकवण्यात आले. पोलिसांनी सुषमाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
Ans: बंगळुरूतील सोलादेवनहल्ली परिसरात.
Ans: हुंड्यासाठी सतत छळ आणि संशयास्पद मृत्यूचा आरोप.
Ans: पतीला अटक; पोस्टमॉर्टम अहवालानंतर पुढील तपास.






