फोटो सौजन्य- pinterest
गुलाब हे फक्त फूल नसून भावनांची भाषा आहे. गुलाबांचे महत्त्व आणि भावना व्यक्त करण्यात त्यांची भूमिका समजून घेतल्यावर, प्रेमाचा हंगाम म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चा आठवडा गुलाब दिनाने सुरू होतो. दरवर्षी 7 फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी दिलेला गुलाब प्रेम, मैत्री, आदर किंवा हृदयातील न बोललेले रहस्य देखील व्यक्त करू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ असतो? जाणून घ्या
रोज डे व्हॅलेंटाईन डे वीकच्या सुरुवातीचा दिवस. हा दिवस नात्यामध्ये नाविन्यता, मैत्री आणि भावनिकता दर्शवते. या दिवशी लोक गुलाब देऊन आपल्या मनातील भावना न न बोलता सांगतात. रोझ डे फक्त गुलाब देण्याचा दिवस नसून तर नातं मजबूत करण्यासाठी संधी असते. योग्य रंगाचा गुलाब देऊन तुम्ही काही न बोलता व्यक्त होऊ शकता. यावेळी रोझ डे ला विचारपूर्वक गुलाब द्या आणि आपल्या नात्यात गोडवा आणा.
खरे प्रेम, आवड आणि खोल भावना लाल गुलाबाचा अर्थ दर्शवतो. लाल गुलाबी प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तसेच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला किंवा क्रशला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
पिवळ्या गुलाबाचा अर्थ मैत्री, आनंद, सकारात्मक ऊर्जा असा होतो. मैत्रीसाठी पिवळा गुलाब शुभ आहे. हा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देऊ शकता पण जोडीदाराला देण्याआधी विचार करा. तो चुकीचा अर्थ काढू नये.
पांढऱ्या गुलाबाचा अर्थ शांतता, पवित्रता आणि सन्मान असा होतो. पांढर गुलाब खरे आणि चांगल्या नात्याचे प्रतीक आहे. हे नवीन नात्याची सुरुवात आणि चंदन मिळवण्यासाठी दिला जातो.
गुलाबी गुलाबाचा अर्थ असा होतो की, प्रशंसा, काळजी आणि कोमलता. जर तुम्हाला एखाद्याला खास वाटायचे असेल पण तुमचे प्रेम थेट व्यक्त करायचे नसेल, तर गुलाबी गुलाब परिपूर्ण आहेत.
नारंगी गुलाबाचा अर्थ आकर्षण उत्साह आणि ऊर्जा होतो. हा गुलाब अशा भावनांचे प्रतिनिधित्व करतो जिथे मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित होत आहे.
दुसऱ्या व्यक्तीशी असलेले तुमचे नाते समजून घ्या
योग्य रंगाची निवड करा.
गुलाबावर एक छोटीशी टीप नक्की जोडा.
दिसण्यापेक्षा भावनांवर लक्ष केंद्रित करा.
Ans: लाल गुलाब प्रेम, उत्कटता आणि गाढ भावनांचे प्रतीक मानला जातो. प्रपोज करण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब दिला जातो.
Ans: आपण व्यक्त करू इच्छित असलेल्या भावनेनुसार गुलाबाचा रंग निवडावा. प्रत्येक रंग एक विशिष्ट संदेश देतो
Ans: होय. वेगवेगळ्या रंगांचे गुलाब एकत्र देणे म्हणजे प्रेम, मैत्री, आदर आणि आनंद अशा अनेक भावना एकाच वेळी व्यक्त करणे होय.






