व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? (Photo Credit- X)
१. पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम (Personalized Photo Frame)
तुमच्या प्रेमाचे क्षण एका फ्रेममध्ये कैद करून देणे हा एक अतिशय भावनिक पर्याय आहे. तुमच्या आवडीचा फोटो आणि एखादा छोटासा मेसेज असलेली फ्रेम पार्टनरला खूप खास वाटते.
२. चॉकलेट गिफ्ट हॅम्पर (Chocolate Gift Hamper)
तुमच्या जोडीदाराला गोड खाण्याची आवड असेल, तर चॉकलेट हॅम्पर हा ‘बेस्ट’ पर्याय आहे. विविध ब्रँडेड चॉकलेट्सचा एक छोटा बॉक्स किंवा आकर्षक पॅकिंगमधील हॅम्पर तुम्ही घेऊ शकता. सोबत एक छोटेसे लव्ह लेटर लिहून हा आनंद द्विगुणित करा.
३. कपल मग किंवा कपल की-चेन (Couple Mugs or Keychains)
कपल मग किंवा की-चेन हे दिसायला अतिशय क्युट आणि डेली युजसाठी उपयुक्त असतात. बॅग किंवा कारच्या चावीला लावण्यासाठी कपल की-चेन हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.
४. परफ्यूम (Perfume)
व्हॅलेंटाइन डेसाठी परफ्यूम हे एक क्लासिक गिफ्ट मानले जाते. तुमच्या पार्टनरला कोणता सुगंध आवडतो, हे लक्षात घेऊन तुम्ही एक चांगला परफ्यूम ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. चांगल्या ब्रँड्सचे मिनी परफ्यूम्स बजेटमध्ये सहज उपलब्ध होतात.
५. हाताने लिहिलेले पत्र किंवा DIY स्क्रॅपबुक (Handwritten Letter or Scrapbook)
जर तुम्हाला तुमचे प्रेम मनापासून व्यक्त करायचे असेल, तर तुमच्या हाताने लिहिलेले पत्र (Handwritten Letter) किंवा स्वतः बनवलेले छोटे स्क्रॅपबुक सर्वात मौल्यवान ठरेल. यामध्ये पैशांपेक्षा तुमचे कष्ट आणि वेळ दिसून येतो, जो पार्टनरसाठी अमूल्य असतो.






