शांत झोपेसाठी सद्गुरूंनी सांगितलेले 'हे' उपाय नक्की करा
सतत धावपळ आणि कामाच्या तणावामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यास उशीर होतो. दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. 7 ते 8 तासांची झोप घेतल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे शरीराला आराम देणे आवश्यक आहे. शरीराला आवश्यक असलेली झोप घेतल्यामुळे सकाळी फ्रेश वाटते आणि संपूर्ण दिवसभर शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहते. पण अनेकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते. रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठल्यानंतर संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी योग्य वेळी उठल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. सकाळी उठल्यानंतर जर दिवसाची सुरुवात थकल्यासारखी झाली तर पूर्ण दिवस तणावात जातो.(फोटो सौजन्य-istock)
रात्री लवकर झोपल्यानंतर सुद्धा काहींना झोप लागत नाही. योग्य वेळी झोप न लागल्यामुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. दिवसभर डोकं दुखणे, अपचन, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शांत झोपेसाठी सद्गुरूंनी सांगितलेले काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास ‘ही’ लक्षणे येतील दिसून
रात्री झोपण्याआधी शरीर स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे आहे. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीरामधील थकवा कमी होऊन मन शांत राहते. अंघोळ करताना पाण्यात मीठ टाकावे. यामुळे त्वचेसंबंधित समस्या सुद्धा दूर होतात. पण रोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे शक्य नसल्यास हात, पाय, चेहरा आणि डोकं कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप मिळते.
सद्गुरुंच्या मते, रात्री झोपण्याआधी तीन ते चार तास आधी जेवण करावे. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पचनक्रियेवर ताण येतो, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे झोपेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. चांगली झोप लागण्यासाठी जेवण आणि झोपेमध्ये चार तासांचे अंतर हवे. झोप पूर्ण झाल्यामुळे शरीर आणि पचनक्रिया चांगली राहते.
चांगली झोप लागण्यासाठी घरात सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. सद्गुरूंनी दिलेल्या सल्यानुसार, झोपण्याआधी खोलीमध्ये काळोख करून घ्या. यामध्ये सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करून ठेवावीत. त्यानंतर शांत आणि ऐकण्यास सुरेल वाटेल असे संगीत लावा. गाणं ऐकल्यामुळे मन शांत होत आणि छान झोप लागते.
रात्री झोपण्याआधी शरीर तणावमुक्त करणे आवश्यक आहे. तणाव मुक्त होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं व्यायाम करावा. व्यायाम केल्यामुळे शरीराचा तणाव कमी होऊन रात्री चांगली झोप लागते. व्यायाम केल्यामुळे मन तणावमुक्त होते.
हे देखील वाचा: हिवाळ्यात शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, हृदयावर येणार नाही ताण
शांत झोप लागण्यासाठी मन शांत असणे फार गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यान केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच झोपेची गुणवत्ता सुधारते. शांत झोप लागण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले हे उपाय नक्की करून पहा. यामुळे मन शांत होईल आणि झोप सुधारेल.