गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा तीळ गुळाचे मोदक
आज संकष्टी चतुर्थी असल्याने गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते. सगळेच लोक गणपतीची मनोभाव पूजा करतात. महिन्यातून एकदा येणाऱ्या संकष्टीला अनेक लोक उपवास करतात. घरामध्ये सुख शांती समाधान लाभावे, कुटुंबातील सर्व व्यक्ती निरोगी राहावेत हा या मागचा उद्देश आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्यानंतर संध्याकाळी बाप्पाची पूजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये मोदक बनवले जातात. काही लोक उकडीचे मोदक बनवतात तर काही रव्याचे मोदक बनतात. पण आज आम्ही तुम्हाला बाप्पाच्या नैवेद्यासाठी तीळ गुळाचे मोदक कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या मोदकांची रेसिपी नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)