नैवेद्यासाठी बनवा सोप्या पद्धतीमध्ये शाही फिरनी
यंदाच्या वर्षी 26 ऑगस्ट ला देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो. थाटामाटात भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसेच दही आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य बाळ गोपाळांना अर्पण केला जातो. त्यामुळे यंदाच्या जन्माष्टमीला श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये शाही फिरनी नक्की बनवून पहा. तुम्ही बनवलेला नैवेद्यातील पदार्थ घरच्यांसह इतरांना सुद्धा आवडेल. फिरनी हा पदार्थ तांदूळ आणि दुधाचा वापर करून तयार केला जातो. कमीत कमी साहित्यामध्ये बनवला जाणार पदार्थ सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया फिरनी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Janmashtami Recipe: यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीला प्रसादासाठी बनवा मथुरेचा पेढा, नोट करा सोपी रेसिपी