दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कृष्ण जन्माष्टमी देशात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे. यंदा 26 ऑगस्टला देशभरात हा सण साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणूनच हा दिवस दरवर्षी आनंदात साजरा केला जातो. या दिवशी भगवान कृष्णाची पूजा करत प्रसादासाठी गोडाचा पदार्थ अर्पण केला जातो.
तुम्हीही यावर्षीच्या कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही खास बनवू इच्छित असाल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. आज आम्ही तुम्हाला मथुरेत मिळतो असा पेढा घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. मथुरा हे कृष्णाचे जन्मस्थान आहे. तुम्ही कान्हाचे भक्त असाल तर तुम्हाला या पेढ्याविषयी नक्कीच माहिती असेल. हा पेढा फक्त चवीला तर अप्रतिम आहेच मात्र बनवायलाही फार सोपा आहे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल आलू टिक्की, लगेच नोट करा रेसिपी