काय घडलं नेमकं?
श्रीकांत नागोराव रामगडे यांची पत्नी प्रसूतीसाठी पंढरकवड्यातील शासकीय रुग्णालयात दाखल होती. तिने एका मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी कळताच गवतील लोकांना ही खुशखबर सांगितली. आपल्या आठ वर्षीय मुलाला सोबत घेऊन ते दुचाकीवरून रुग्णालयात आपल्या पत्नी आणि बाळाला भेटण्यासाठी निघाले. सोमवारी संध्याकाळी ते घराबाहेर पडले. अंधार असल्यामुळे त्यांना वाटेत उभा असलेला ट्रॅक्टर दिसला नाही आणि त्यामुळे, पीडित श्रीकांत यांची बाईक त्या ट्रॅक्टरवर धडकली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा आठ वर्षीय मुलाचा सुद्धा या अपघातात गंभीररीत्या जखमी झाला.
ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणाची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी मुलाला आणि श्रीकांतला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच श्रीकांत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पांढरकवडा पोलिसांनी ट्रॅक्टरच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्रीकांत यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये अचानक शोककळा पसरली आहे.
पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूरजवळील डुंबरवाडी येथे आज, मंगळवार (३० डिसेंबर) रोजी सकाळी हॉटेल अभिजितच्या जवळ पिकअप आणि दूध टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पिकअपमधील दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य अंदाजे ३५ ते ३८ जण जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
Ans: पांढरकवड्याकडे जात असताना अंधारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने अपघात झाला.
Ans: श्रीकांत नागोराव रामगडे (36) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा 8 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे.
Ans: पांढरकवडा पोलिसांनी ट्रॅक्टर मालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






